Join us
Daily Top 2Weekly Top 5

किचन कल्लाकारच्या किचनमध्ये 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या कलाकारांचा कल्ला, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:07 IST

झी मराठीवरील किचन कल्लाकार या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय.

झी मराठीवरील किचन कल्लाकार या लोकप्रिय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. नुकतंच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेत कलाकार आता किचन कल्लाकरच्या सेटवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि अभिज्ञा भावे त्याचसोबत दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे किचन कल्लाकर या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना दिसतील. या भागात महाराजांसाठी चविष्ट पदार्थ करताना या कलाकारांची तारांबळ तर उडालीच पण त्याचसोबत या कलाकारांनी सगळ्यांसोबत काही मजेदार किस्से देखील शेअर केले. अभिज्ञा भावे हिने एकदा मालिकेच्या सेटवर पावभाजी नेली.

 आईने डब्बा भरून बास्केट मध्ये ठेवला त्यामुळे अभिज्ञाला त्याची कल्पना नव्हती आणि तिने सेटवर जाऊन तिने सगळ्यांसाठी पावभाजी आणली असल्याचं सांगितलं पण जेव्हा बास्केट उघडलं तेव्हा नक्की काय झालं? हे प्रेक्षकांना आगामी भागात कळेल. 

टॅग्स :अभिज्ञा भावेस्वप्निल जोशी