गेल्या आठवड्यात कॉमनर म्हणून बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सहभागी झालेली बंदगी कालरा घराबाहेर पडली. शोमध्ये बंदगी पुनीश शर्मासोबतच्या रोमान्समुळे चांगलीच चर्चेत राहिली. आता ती घराबाहेर पडताच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाली असून, तिने जबरदस्त बोल्ड पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तिने एक फोटोशूटही केले आहे. बंदगीचे हे फोटो डब्बू रतनानी यांनी शूट केले आहेत. हे फोटो बंदगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. फोटोमध्ये बंदगी टॉपलेस अवतारात दिसत आहे. बंदगीचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या फोटोमुळे बंदगी ट्रोलदेखील होत आहे. बंदगीच्या या फोटोला अतिशय अश्लील भाषेत कॉमेण्ट दिल्या जात आहेत. या कॉमेण्ट एवढ्या अश्लील आहेत की, त्या आम्ही लिहू शकत नाहीत. बंदगीने याअगोदरदेखील बिग बॉसच्या घरातील तिच्या बेडचा फोटो शेअर केला होता. त्यावरूनही तिला अशाच प्रकारच्या कॉमेण्ट देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, बिग बॉस शोच्या बाहेर पडल्यानंतर बंदगीने माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, ती खरोखरच पुनीश शर्मावर प्रेम करते. लोक काहीही म्हणत असले तरी, पुनीशसोबतचे माझे नाते खरे आहे. शिवाय हे नाते कायम ठेवणार असल्याचेही तिने सांगितले. यावेळी तिने घराबाहेर आल्यानंतर पुनीशची खूप आठवण येत असल्याचेही म्हटले. जेव्हा तिला एक्स बॉयफ्रेंड डेनिस नागपालविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने स्पष्ट केले की, बिग बॉसच्या घरात एंट्री करण्याअगोदरच मी डेनिससोबतचे नाते तोडले होते. नागपाल पब्लिसिटी मिळविण्यासाठी माझ्या नावाचा आरोप करीत आहे.
यावेळी बंदगीने हेदेखील स्पष्ट केले की, घरमालकाने माझ्या कुटुंबीयांना घराबाहेर काढल्याच्या बातम्या निराधार आहे. त्याचबरोबर माझ्या वडिलांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्याही चुकीच्या आहेत. जर असे काही घडले असते तर बिग बॉसच्या मॅनेजमेंटने मला याबाबतच्या सूचना नक्कीच दिल्या असत्या, असेही बंदगीने स्पष्ट केले.