Join us

कल आज और कल. पाहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 18:06 IST

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणारे अनेक कलाकार सध्या अभिनयापासून दूर आहेत. हे कलाकार सध्या काय करत आहेत ...

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणारे अनेक कलाकार सध्या अभिनयापासून दूर आहेत. हे कलाकार सध्या काय करत आहेत यावर एक नजर टाकूया...प्राजक्ती देशमुख ः प्राजक्ती देशमुख सैलाब, थोडा है थोडे की जरुरत है यांसारख्या मालिकेत काम केले होते. गेली कित्येक वर्षं ती अभिनयापासून दूर आहे. सध्या ती तिच्या कुटुंबियांसोबत इंडोनेशियामध्ये राहात आहे.निकी अनेजा ः निकी अनेजाने गंभीर आणि कॉमिक अशा दोन्ही भूमिका खूप चांगल्यारितीने सादर केल्या होत्या. सी हॉक्स, बात बन जाये, अस्तित्व - एक प्रेम कहानी या तिच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. निकी लग्नानंतर युकेत स्थायिक झाली.शारोख बरुचा ः हिप हिट हुर्रे या मालिकेतील अतिशय वात्रट असलेला सायरस तुम्हाला आवडत असलेलच. सायरसची भूमिका साकारणारा शारोख सध्या न्यूझिलंडमध्ये राहात असून तो व्यवसायाने बँकर आहे.प्रवीण कुमार ः महाभारत या मालिकेतील भीम या व्यक्तिरेखेला प्रविण कुमारने त्याच्या अभिनयाद्वारे योग्य न्याय दिला होता. या मालिकेनंतर प्रवीणने काही चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या. पण त्याने गेल्या १५-२० वर्षांत कोणत्याही चित्रपटात, मालिकेत काम केले नाही. प्रवीण सध्या राजकारणात सक्रिय असून तो भारतीय जनता पार्टीत आहे. प्रवीणने आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीतून निवडणूकही लढवली होती. पण त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते.निलंजना शर्मा ः हिप हिप हुर्रे या मालिकेतील मोना म्हणजेच निलंजना शर्मा ही सध्या अभिनय करत नसली तरी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधितच काम करत आहे. तिने आतापर्यंत अनेक बंगाली चित्रपटांची निर्मिती केली आहे. निलंजनाने बंगाली अभिनेता जिश्शू सेनगुप्ताशी लग्न केलेले आहे.पूजा मदन ः अमानत या मालिकेतील संतोष ही व्यक्तिरेखा साकारणारी पूजा मदन आज इंडस्ट्री, मीडिया यांच्यापासून खूप दूर आहे. तिने २००३ साली दीपक चंदन या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱया व्यक्तिशी लग्न केले होते. तिला एक मुलगी असून ती आता दहा वर्षांची आहे. राकेश थरेजा ः देख भाई देख या मालिकेतील डिंगू, दिल विल प्यार व्यार या मालिकेत कधी संजय तर कधी संजना साकारणारा राकेश मुंबईतच राहात असला तरी त्याचा आज अभिनयाशी काहीही संबंध नाहीये. राकेश आज इतका बदलला आहे की, त्याला ओळखणेही खूप कठीण आहे.प्रियांका मेहरा ः हम पाच या मालिकेत नेहमीच बडबड करणारी छोटी सगळ्यांची लाडकी बनली होती. या मालिकेत ती पत्रकार बनण्याची स्वप्नं पाहात असे. प्रियांका मेहराने शिक्षण झाल्यानंतर हाच व्यवसाय निवडला होता. ती सेव्हेंटिन नावाच्या मासिकासाठी काम करत होती.  पण सध्या ती प्रोडक्शन हाऊससोबत काम करत आहे. रमण त्रिखा ः बनेगी अपनी बात, कुमकुम, मन यांसारख्या मालिकेत काम केलेल्या रमणचे फिमेल फॅन फॉलॉविंग मोठ्या प्रमाणावर होते. रमणने काही चित्रपटातही काम केले होते. पण त्याला मोठ्या पडद्यावर अपयश मिळाले. रमण गेली अनेक वर्षं मालिकांपासून दूर आहे. सध्या छोट्या पडद्यावर काम करण्यासारखे काहीच नाही असे त्याचे मत आहे. फिरदोस दादी ः फिरदोस दादीने बनेगी अपनी बात, इम्तिहानसारख्या हिट कार्यक्रमात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. २०१० साली बंदिनी या मालिकेत काम केले होते. पण त्यानंतर ती छोट्या पडद्यावर झळकली नाही. रोशनी अर्चेजा ः बनेगी अपनी बात या मालिकेमुळे रोशनी खूप प्रसिद्ध झाली होती. रोशनीने चित्रपट, मालिकेत काम करणे कित्येक वर्षांपूर्वीच बंद केले आहे. रोशनी ही अभिनेती रघुवीर यादवची पत्नी आहे.