Join us  

Mahabharat : तुझा दुसराही पाय तोडून हातात देईन... जेव्हा ‘शकुनी’ला मिळाली होती धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 9:59 AM

एक मजेदार किस्सा...

ठळक मुद्देशकुनी मामा बनण्यापूर्वी गुफी हे आर्मीत होते.

लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवर सुरु झालेल्या अनेक मालिकांपैकी एक असलेल्या रामायण या मालिकेचा उदंड प्रतिसाद मिळतोय. याशिवाय महाभारत या मालिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम मिळतेय. आज महाभारतातील शकुनी मामा अर्थात हे पात्र साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होय, शकुनी मामा हे महाभारताची पात्र गुफी पेंटल यांनी साकारले होते. ‘महाभारतासारख्या महान ऐतिहासिक मालिकेत काम करण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. मी शकुनीची भूमिका साकारल्यामुळे भलेही लोक माझा तिरस्कार करतात. आजही मला शकुनी मामा म्हणतात. पण महाभारतात काम करण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते,’ असे गुफी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.फार कमी लोकांना माहित असेल की, गुफी यांनी केवळ शकुनी मामाची भूमिकाच नाही तर या मालिकेचे कास्टिंग डायरेक्टर आणि प्रॉडक्शन डिझाईनर म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

एका मुलाखतीत खुद्द गुफी यांनी एक मजेदार किस्सा ऐकवला होता. तोच किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.तुम्हाला ठाऊक आहेच की, महाभारतातील शकुनी मामा काहीसा लंगडत चालायचा. त्याकाळी महाभारत टीव्हीवर सुरु असताना गुफी यांना रोज हजारो पत्र मिळत. एकदा त्यांना असेच पत्र मिळाले. पण ते कुण्या चाहत्याचे पत्र नव्हते तर त्या पत्रातून गुफी यांना धमकी दिली गेली होती. ‘ओए शकुनी, तू अतिशय वाईट काम केलेस. कौरव आणि पांडवांमध्ये फूट पाडलीस. द्रौपदीचे वस्त्रहरण करवले. इतकेच नाही तर आमच्या भगवान श्रीकृष्णाचेही न ऐकता युद्ध घडवलेस. पुढच्या एपिसोडपर्यंत युद्ध बंद झाले नाही तर मी तुझा दुसरा पायही तोडून तुझ्या हाती देईल, अशी धमकी पत्र पाठवणा-याने या पत्रात दिली होती.

शकुनी मामा बनण्यापूर्वी गुफी हे आर्मीत होते आणि भारत-चीन सीमेवर रामलीला करायचे. या रामलीलेत गुफी यांना सीतेची भूमिका मिळायची. होय, 1962 साली भारत-चीन युद्ध सुरु झाले तेव्हा गुफी इंजिनिअरिंग करत होते. यादरम्यान कॉलेजातून आर्मीत थेट भरती सुरु होती. गुफी यांना सुरुवातीपासून आर्मीत जाण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनीही ही संधी स्वीकारली. त्यांना चीन सीमेवरच्या आर्मी आर्टिलरीत पोस्टिंग मिळाली होती. बॉर्डरवर टीव्ही वा रेडिओ किंवा मनोरंजनाचे कुठलेही साधन नव्हते. अशात मनोरंजनासाठी जवान रामलीला करत. खुद्द गुफी यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.

टॅग्स :महाभारतटेलिव्हिजन