Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ही फेज येत असणार...", प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 16:04 IST

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये पाहायला मिळते आहे. या शोमध्ये ती सूत्रसंचालनाने रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान नुकतेच सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंपेक्षा तिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.  तिने लिहिले की, फोटोशूटचा आलाय कंटाळा… इतका की यावेळी फोटोसाठी खूर्चीवरून पण उठले नाहीये…डिझायनर म्हणाली फुल लेंथ फोटो पण पोस्ट करावा लागेल; म्हणून शोधून शोधून चालू शूटमध्ये काढला गेलेला फोटो मिळवलाय… मला खात्री आहे की, प्रत्येक कलाकाराच्या आयूष्यात ही फेज येत असणार...

वर्कफ्रंट...प्राजक्ताबद्दल सांगायचं तर छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.  

टॅग्स :प्राजक्ता माळी