Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाघा शोधणार चोराला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:00 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत 10 करोडची साडी चोरीला गेली आहे आणि त्याचा आळ तारक मेहता आणि ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत 10 करोडची साडी चोरीला गेली आहे आणि त्याचा आळ तारक मेहता आणि जेठालालवर आला आहे. त्या दोघांना इन्स्पेक्टर चालू पांडेने अटकदेखील केली आहे. पण आता ही साडी चोरली कोणी हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. खरा चोर कोण आहे हे शोधण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. पण हा चोर बाघा शोधून काढणार आहे. प्रदर्शन सुरू व्हायच्या आधी बाघाने तिथे सीसीटिव्ही लावल्याचे त्याच्या लक्षात येणार आहे. हे सीसीटिव्ही पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. कारण या साडीची चोरी साडीच्या मालकाची पत्नीच करणार आहे. तिने ही चोरी का केली याचे उत्तर आपल्याला मालिका पाहिल्यानंतरच मिळेल.