Join us

हळद लागली..! बिग बॉस मराठी विजेता लवकरच अडकणार लग्नबेडीत, हळदीला पोहचले कलाकार मंडळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:04 IST

Akshay Kelkar : अक्षय केळकर त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकरसोबत लवकरच लग्न करणार आहे. अभिनेत्याच्या घरी नुकताच ग्रहमख विधी पार पडला. त्यानंतर त्याच्या घरी दणक्यात हळदी समारंभ पार पडला.

यंदा मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. आता लवकरच आणखी एक मराठमोळा अभिनेता लग्नगाठ बांधतोय. हा अभिनेता म्हणजे बिग बॉस मराठीचा विजेता अक्षय केळकर (Akshay Kelkar). त्याच्या घरी लग्नाच्या विधींना सुरूवात झाली असून अलिकडेच सोशल मीडियावर ग्रहमखचे फोटो पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता त्याच्या हळदीच्या कार्यक्रमाचेही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

अक्षय केळकर त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकरसोबत लवकरच लग्न करणार आहे. अभिनेत्याच्या घरी नुकताच ग्रहमख विधी पार पडला. त्यानंतर त्याच्या घरी दणक्यात हळदी समारंभ पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्याच्या हळदीला सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यात प्रथमेश परब, समृद्धी केळकर यासांरखे कलाकार पाहायला मिळाले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत हळदीला कलाकार मंडळींची धमालमस्ती पाहायला मिळाली. 

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अक्षय केळकरने त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकरची ओळख सोशल मीडियावर करून दिली होती. ते जवळपास १० वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. साधना ही गायिका असून तिने मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा या गाण्यांना सुरेल साज दिला आहे. आता ही जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. त्यासाठी त्यांनी रमाक्षय हा हॅशटॅगही बनवला आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समजू शकलेली नाही. मात्र त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.   

टॅग्स :बिग बॉस मराठी