Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेलिव्हिजनवरील सर्वात महागडी अभिनेत्री आहे सुंबुल तौकीर खान, एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते एवढे मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:30 IST

Sumbul Touqeer Khan: सुंबुल तौकीर खानची गणना आता टीव्हीच्या लोकप्रिय आणि महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.

इमली ते बिग बॉस १६ असा छोट्या पडद्यावर प्रवास करणारी सुंबुल तौकीर खान(Sumbul Touqeer Khan)ची गणना आता टीव्हीच्या लोकप्रिय आणि महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. दुसरीकडे, सोनी टीव्हीवर तिची काव्या एक जज्बा एक जुनून ही मालिका येत आहे, ज्याचे प्रोमो सध्या चर्चेत आहेत. पण यासोबतच सुंबुल तौकीर खान महागडी अभिनेत्री असल्याची चर्चा रंगली आहे.

काव्या या टीव्ही मालिकेत सुंबुल एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे जिने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचबरोबर ही भूमिका साकारण्यासाठी सुंबुलने किती फी घेतली आहे, तुम्हाला माहित्येय का. एका न्यूज पोर्टलनुसार,"काव्यासाठी सुंबुलला दररोज सुमारे ७५-८० हजार रुपये दिले जात आहेत. अभिनयामुळे ती आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सुंबुल तौकीर खानने बऱ्याच मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख इमली या मालिकेतून मिळाली आहे. यात आर्यन सिंह राठौड उर्फ फहमान खानसोबतची सुंबुलची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. बिग बॉस १६मध्ये एन्ट्री केल्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली आणि ती टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या १९व्या वर्षीच तिने यश संपादन केले आहे. तिच्या कामगिरीमुळे ती खूप खूश आहे.