Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, म्हणाली - 'मी येत आहे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:55 IST

Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा शो घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्यांची मेजवानी मिळत असते.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्यांची मेजवानी मिळत असते. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडतात. या कार्यक्रमातील विनोदवीर घराघरात लोकप्रिय झाले आहेत. पण काही दिवसांपूर्वीच या शोमधून काही कलाकारांनी तात्पुरती एक्झिट घेतली होती. आता या शोमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार.

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये अभिनेत्री अश्विनी कासारची एंट्री होणार आहे. आजवर सुख म्हणजे नक्की काय असतं, कमला यासारख्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारी अश्विनी पहिल्यांदाच विनोदी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी अश्विनी कासार खूपच उत्सुक आहे.

अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली की, 'आज रात्री ९ वाजता मी येत आहे तुमच्या, आमच्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या कार्यक्रमात..!! महाराष्ट्राची हास्यजत्रा..!! मला ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमचे खूप खूप आभार.'

अश्विनी कासारला आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पाहायला चाहते उत्सुक असून कलाकार मित्र आणि चाहते तिचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा देत आहेत. या शोमधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव काही दिवसांसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तिची जागा आता अश्विनीने घेतली आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा