Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'येणार मोठा ट्विस्ट; सिम्मी भरणार नेहाविरोधात आजोबांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:38 IST

Mazhi Tuzhi Reshimgath: नेहा आणि यशाच्या मार्गातील अडचणी काही कमी होतानाच दिसतं नाहीत.

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सध्या या मालिकेत अनेक रंजक वळण येतं असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत खूप ट्विस्ट आणि टर्नस येतात. नेहा आणि यशाच्या मार्गातील अडचणी काही कमी होतानाच दिसतं नाहीत. सिम्मी यशसाठी एका मागोमाग एक स्थळ घेऊन येतेय. तर जग्गू आजोबा नेहा आणि यशचं लग्न व्हावं यासाठी आतापर्यंत प्रयत्न करताना दिसत होता. मात्र आता कहानीमध्ये ट्विस्ट येणार आहे. 

सिम्मीला हे कळूनच चुकलंय की यश नेहाच्या प्रेमात पडलाय, म्हणून ती नेहाला भेटण्याचं ठरवतं.समोर आलेल्या प्रोमोमध्ये सिम्मी नेहाला भेटण्याासाठी तिच्या घरी जाते आणि तिथं जाऊन तिला परी दिसते. नेहा सिम्मीला घरी पाणी पिण्यासाठी बोलवतं. तेवढ्यात परी येते आणि विचारते कोण आहात तुम्ही आईला भेटायला आलात का?, यावर सिम्मीना नकारर्थी मान डोलवून नेहा कामत असं सांगते. यावर परी म्हणते तिच तर माझी आई आहे. यानंतर सिम्मीला घरात नेहा आणि परीचं फोटो दिसतात, असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. 

आता सिम्मी घरी जाऊन जग्गू आजोबांचे नेहा विरोधात कान भरणार का?, यश ज्या मुलीच्या प्रेमात आहे ती एका मुलीची आई आहे हे सांगून जग्गू आजोबांना या लग्नाच्या विरोधात उभं करणार का?, आतापर्यंत जे आजोबा यश आणि नेहाचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करत होते ते आता नेहाचं सत्य कळल्यावर या तिला नात सून म्हणून स्वीकारतील का?, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी