Join us

ठरलं तर मग: माधव अभ्यंकरांनी सोडली मालिका; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची होणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:55 IST

Tharla tar mag: या अभिनेत्याने आई कुठे काय करते मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेने २०० पेक्षा जास्त भागांचा टप्पा गाठला आहे. इतकंच नाही तर अगदी कमी काळात या मालिकेने लोकप्रियता मिळत टीआरपीमध्ये प्रथम स्थान मिळवलं आहे. परंतु, एकीकडे मालिका गाजत असतानाच अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने ही मालिका सोडली. तिच्याच पाठोपाठ आता अभिनेता माधव अभ्यंकर यांनीही या मालिकेला रामराम केला आहे. 

जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेतून अलिकडेच मीरा जगन्नाथने काढता पाय घेतला. तिच्या जागी आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्री एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे मीरानंतर या मालिकेत महिपत ही भूमिका साकारणारे माधव अभ्यंकर यांनीदेखील ही मालिका सोडायचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यांच्या जागी आई कुठे काय करते या मालिकेतील एका अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

अभिनेते माधव अभ्यंकर 'ठरलं तर मग' या मालिकेत साक्षीचे वडील अर्थात खतरनाक गुंड महिपत ही भूमिका साकारत होते. परंतु, आता त्यांच्या जागी ही भूमिका अभिनेता  मयूर खांडगे साकारणार आहे. मयूरने यापूर्वी आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या पहिल्या पतीची शेखरची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीआई कुठे काय करते मालिका