Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठरलं तर मग'मधील सुमन काकीचा खऱ्या आयुष्यातील नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, पाहा कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 07:00 IST

Tharala Tar Mag : ठरलं तर मग मालिकेत तन्वीच्या काकीची भूमिका अभिनेत्री श्रद्धा केतकर वर्तक यांनी साकारलेली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल आहे. नुकतेच या मालिकेचा २००वा भाग प्रसारीत करण्यात आला. या निमित्ताने मालिकेची सर्व टीम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी मालिकेचे निर्माते सुचित्रा, आदेश बांदेकर आणि त्यांचा मुलगा सोहम बांदेकर हे देखील उपस्थित होते. 

ठरलं तर मग मालिकेत तन्वीच्या काकीची भूमिका अभिनेत्री श्रद्धा केतकर वर्तक यांनी साकारलेली आहे. श्रद्धा वर्तक या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. मधल्या काळात मुलाच्या जन्मानंतर तिनेअभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. चार चौघी, आंबट गोड, एक डाव भटाचा अशा सिनेमा, नाटकातून त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. ठरलं तर मग मालिकेतील त्यांची भूमिका सकारात्मक असल्यामुळे ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.

श्रद्धा वर्तक या प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असलेल्या संचित वर्तकच्या पत्नी आहेत. संचित हा विनोदी अभिनेता म्हणून झळकला होता. मात्र पुढे जाऊन दिग्दर्शनात त्याने पाऊल टाकले. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्याने अनेक हॉलिवूड चित्रपट, कार्टून कॅरॅक्टर्सना आवाज दिला आहे. या क्षेत्रात त्याने चांगला जम बसवलेला पाहायला मिळतो. 

ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत सायलीने पूर्णा आजीचे मन जिंकून घेतले आहे. त्यामुळे आता पूर्णा आजी सायली आणि अर्जुनचे लग्न लावण्याचा घाट घालत आहेत.  मात्र आता आजीच्या या भूमिकेमुळे दोघेही अडचणीत सापडणार आहेत. सायली आणि अर्जुन या लग्नाला तयार होणार की नाही हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.