मराठी मनोरंजन विश्वात प्राची पिसाट (prachi pisat) प्रकरण चांगलंच गाजतंय. प्राचीला अभिनेते सुदेश म्हशिलकर (sudesh mhashilkar) यांनी मेसेज करुन फ्लर्ट करु का, असं उघडपणे विचारल्याने अभिनेत्रीने त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केल्याने एकच खळबळ उडाली. प्राचीच्या समर्थनार्थ अनेक मराठी अभिनेत्री पुढे आल्या आहेत. अशातच 'ठरलं तर मग' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीने कमेंट करुन प्राचीला सपोर्ट केलाय. याशिवाय इंडस्ट्रीतील कटू वास्तव सगळ्यांना सांगितलं आहे.
प्राचीला सपोर्ट करताना ठरलं तर मग फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे कमेंट करत म्हणाल्या की, "प्राची खूप छान केलंस ही पोस्ट शेअर करुन. कारण इंडस्ट्रीतल्या काही लोकांना वाटतं की सगळ्याच मुली अशा असतात आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असतात. हा त्यांचा गैरसमज दूर व्हायलाच हवा. आणि काही लोकांच्या मते आपली इंडस्ट्री बदनाम आहे ती तरी होणार नाही. आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करुन आमच्या फॅमिलीसोबत प्रामाणिकपणे राहतो." प्राचीने या कमेंटखाली प्राजक्ता यांचे आभार मानत लिहिलं की, "ताई.. खूप खूप धन्यवाद.. मलाही तुमचा अभिमान आहे.. एक आई म्हणून तुम्ही कायमच आजूबाजूच्या अनेक मुलींना धाडसी होण्यास प्रेरित केले आहे."
प्राची पिसाट प्रकरण
प्राचीने काही तासांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर स्क्रीनशॉट शेअर केले. यात सुदेश म्हशिलकर यांनी अभिनेत्रीला "तुझा नंबर पाठव...तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये...कसली गोड दिसतेस", असा मेसेज केला आहे. तर दुसऱ्या मेसेजमध्ये "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह", असं सुदेश यांनी म्हटलं आहे.
हे स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने सुदेश यांना चोख उत्तर दिलं आहे. "...आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच...ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का...मला धमकावून, प्रेशर आणून पोस्ट डिलीट करायला सांगून गप्प राहायला सांगितलं. त्यामुळेच मला वाटतं की ही पोस्ट आता माझ्या इन्स्टाग्राम फीडमध्ये असावी. चला विषय संपवुया...जोपर्यंत सुदेश म्हशिलकर गोड अपोलोजी पोस्ट करत नाही. ते देखील माझ्या नंबरवर नाही तर फेसबुकवर...माफी मागायची इच्छा नसेल आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते", असा खुलासा करुन प्राचीने सुदेश म्हशिलकर यांचं चॅट सर्वांना दाखवलं.