Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी साकारलेल्या भूमिकांमध्ये थंगबली माझी सर्वात आवडती- निकितीन धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 17:37 IST

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ मालिकेत वीर प्रताप चौहानची व्यक्तिरेखा साकर करणार्‍्या निकितीन धीर या अभिनेत्याने आजवर आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक भूमिका ...

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ’ मालिकेत वीर प्रताप चौहानची व्यक्तिरेखा साकर करणार्‍्या निकितीन धीर या अभिनेत्याने आजवर आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक भूमिका खलनायकाच्याच केल्या आहेत. या अनेक खलनायकांच्या भूमिकांमध्ये शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटातील थंगबलीची भूमिका आपली सर्वात आवडती भूमिका असल्याचे निकितीन धीरने सांगितले.
निकितीनने सांगितले, “थंगबली ही अशी व्यक्तिरेखा आहे जी साकारताना माझ्यातील अभिनेत्याचा कस लागला; कारण त्यावेळी माझ्यासमोर तितकाच तगडा अभिनेता होता- शाहरूख खान!  तो अतिशय समजुतदार तर आहेच, पण तो तुम्हाला अधिकाधिक उत्तम अभिनय करण्यास प्रवृत्त करतो. थंगबली हा नायकाच्या (शाहरूख खान) विरोधात असल्याने तो खलनायक बनतो. त्यामुळे शाहरूखच्या विरोधात प्रमुख खलनायकाची भूमिका मला रंगविता आली, याचा मला आनंद वाटतो.”

‘इश्कबाझ’ मालिकेत वीर प्रताप चौहान ही व्यक्तिरेखा रंगविण्यासंदर्भात तो म्हणाला, “माझ्या भूमिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांनी मला वीरच्या भूमिकेत स्वीकारल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. ही नकारात्मक भूमिका असली, तरी तिच्यात एक मेख आहे. ही भूमिका रंगविताना मला खूप समाधान वाटतं.”