Join us  

तेजस्विनीला मिळाला शांतनू महेश्वरीमध्ये तिचा नवा ‘पहरेदार’? मालिका होणार नव्याने सुरू !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 3:33 PM

काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आलेली वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका आता नव्याने सुरू होणार आहे. वास्तविक जेव्हा ही ...

काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आलेली वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका आता नव्याने सुरू होणार आहे. वास्तविक जेव्हा ही मालिका बंद करण्यात आली होती, तेव्हाच निर्मात्यांनी मालिका नव्या कथेसह घेऊन येणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, मालिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत असणार आहे, तर अभिनेत्याचा शोध अजूनही सुरूच असल्याचे बोलले जात होते. परंतु आता आलेल्या माहितीनुसार तेजस्वी प्रकाशचा ‘पहरेदार’ म्हणून शांतनू महेश्वरी याचे नाव पुढे आले असून, मालिकेची टीम त्याला अ‍ॅप्रोच झाली आहे. परंतु जेव्हा शांतनूला याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने, ‘निर्मात्यांची टीम मला अ‍ॅप्रोच झालीच नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने हेदेखील सांगितले की, अशाप्रकारच्या बातम्या का पसरविल्या जात आहेत, हे मला अजूनही कळालेले नाही.’ शांतनू कलर्सवर प्रसारित होणाºया ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोचा टॉप ३ फायनलिस्ट आहे. तो हिना खान आणि रवि दुबे यांना फायनलमध्ये टक्कर देणार आहे. त्याचबरोबर शांतनू ‘झलक दिखला जा’ या शोचाही भाग राहिला आहे. या शोमध्ये तो परीक्षक जॅकलीन फर्नांडिस हिचा सर्वात क्लोज कंटेस्टेंट होता. दरम्यान, ‘पहरेदार पिया की’ या मालिकेविषयी काही दिवसांपूर्वीच एक पेटिशन साइन केले होते. ज्यावर लाखो लोकांनी हस्ताक्षर करीत ही मालिका बंद करण्याची मागणी केली होती. पुढे हे प्रकरण बीसीसीसीपर्यंत गेले. यावर निर्वाळा देताना बीसीसीसीने सोनल चॅनलला मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार मालिका प्राइम टाइम ८.३० ऐवजी रात्री १०.३० वाजता प्रसारित करण्याचे ठरले; मात्र अशातही लोकांचा वाढता दबाव लक्षात घेऊन निर्मात्यांनी मालिका बंद केली. मालिका बंद केल्याने स्टारकास्टला याचा जबरदस्त झटका बसला होता.