नवरात्रीच्या या शुभपर्वात, प्रत्येक दिवस देवीच्या एका विशिष्ट रूपाची महती सांगतो. या नऊ शक्तींचे गुण आपल्या जीवनात उतरवणे ही काळाची गरज आहे. याच संदर्भात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान( Tejashree Pradhan)ने तिची सकारात्मक बाजू उलगडली आहे.
तेजश्री प्रधानने सांगितले की, तिला देवीच्या महागौरी रूपातील गुणधर्म आत्मसात करायला आवडतात. महागौरीची शुद्धता आणि शांतीची भावना तिला खूप भावते आणि त्यामुळेच ती स्वतःच्या आयुष्यात आणि प्रत्येक कामात शांतता आणि पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न करते.
महागौरी हे देवीचं आठवं रूप
महागौरी हे देवीचं आठवं रूप आहे, जे पवित्रता, सौम्यता आणि मनाच्या निर्मळतेचे प्रतीक मानले जाते. तेजश्री प्रधानच्या या विचारातून हे सिद्ध होतं की, जीवनात यश आणि संतुलन मिळवण्यासाठी बाह्य सौंदर्यापेक्षा आत्मिक शुद्धता आणि शांती किती महत्त्वाची आहे. या नवरात्रीत, आपणही तेजश्रीप्रमाणे महागौरीचे हे गुण स्वीकारून जीवन अधिक शांत आणि पारदर्शक करू शकतो.
'वीण दोघातली ही तुटेना' मालिका'वीण दोघातली ही तुटेना' मालिका सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यात तेजश्रीशिवाय सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. वृद्धाश्रमावरून स्वानंदी आणि समरमध्ये असलेला गैरसमज लवकरच दूर होणार आहे. एवढे दिवस समरसमोर स्वानंदी स्वार्थी आणि उद्धट असलेली इमेज पुसली जाणार आहे आणि तिची एक वेगळी बाजू समोर येणार आहे. दुसरीकडे लवकरच स्वानंदीचा साखरपुडा होणार आहे. वय कमी दाखवून केलेला हा साखरपुडा यशस्वी होईल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
Web Summary : Tejashree Pradhan embraces Mahagauri's purity and peace, integrating these virtues into her life and work. Her show, 'Veen Doghatli Hi Tutena', gains popularity with an engaging plot.
Web Summary : तेजश्री प्रधान ने महागौरी की पवित्रता और शांति को अपनाया, इन गुणों को अपने जीवन और काम में एकीकृत किया। उनका शो, 'वीण दोघातली ही तुटेना', एक आकर्षक कथानक के साथ लोकप्रियता हासिल कर रहा है।