टेड टॉक्स इंडिया नई सोचमध्ये येण्यास या कारणामुळे ए. आर. रेहमानने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 14:21 IST
‘स्वदेस’ असो, ‘दिल से’ असो की अन्य कोणताही चित्रपट, शाहरूख खान आणि ए. आर. रेहमान एकत्र आल्यावर त्यांनी पडद्यावर ...
टेड टॉक्स इंडिया नई सोचमध्ये येण्यास या कारणामुळे ए. आर. रेहमानने दिला नकार
‘स्वदेस’ असो, ‘दिल से’ असो की अन्य कोणताही चित्रपट, शाहरूख खान आणि ए. आर. रेहमान एकत्र आल्यावर त्यांनी पडद्यावर आपली जादू पसरवली नाही असे कधी होतच नाही. स्टार प्लसवरील टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमात हे दोन सुपरस्टार प्रथमच एकत्र येणार होते. शाहरूख या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असून रेहमानला चित्रपट संगीत क्षेत्रातील आपले अनुभव सांगण्यासाठी एक वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. एका छोटेखानी मुलाखतीतून हे दोघे ‘दिल से’ची जादू या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पुन्हा जिवंत करणार होते. पण रेहमानकडे टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी तारखा उपलब्ध नसल्याने ए. आर. रेहमान या कार्यक्रमाचा भाग होऊ शकला नाही. या कार्यक्रमाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमाच्या एका भागासाठी रेहमान चित्रीकरण करणार होता. परंतु त्याने त्याच्या एका कामासाठी आधीपासूनच तारखा दिल्या असल्याने टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी त्याच्याकडे तारीखच उपलब्ध नव्हती. रेहमानबरोबर कार्यक्रम करण्याच्या कल्पनेने शाहरूख खूपच उत्साहित झाला होता. त्याच्यासोबतचा भाग अतिशय चांगला व्हावा यासाठी तो त्याच्या मुले आणि कार्यक्रमाच्या टीमसोबत गाण्यांचा सरावही करीत होता. टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमाद्वारे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असून स्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाने शाहरूख खान, टेड टॉक्स आणि स्टार इंडिया या तीन महत्त्वाच्या ब्रॅण्डना एकत्र आणले आहे. याविषयी शाहरुख सांगतो, इंटरनेटद्वारे टेड टॉक्सची लोकप्रियता वाढण्यापूर्वीपासूनच मी टेड टॉक्सचा फार मोठा चाहता होतो. या कार्यक्रमाला मी माझ्या जीवनातील माझी सर्वात मोठी कमाई मानतो, या कार्यक्रमाने मला स्वत:ला व्यक्त होण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी एक कलाकार आहे, जो भावना व्यक्त करू शकतो, गाणं गाऊ शकतो किंवा नाचू शकतो. मी एक मित्र, वडील, पती, उद्योगपती असलो, तरी टेड टॉक्सने मला माझ्यातील व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मी जेव्हा या कार्यक्रमात सर्वप्रथम भाषण केले, तेव्हा मी मनातून काहीसा घाबरलो होतो. पण या कार्यक्रमाचे प्रमुख ख्रिस अॅण्डरसन यांनी मला धीर दिला. जगात काय घडत आहे, त्याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत असतं, हेच कुतुहल माझ्याही मनात असल्याने मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचे ठरवले.Read : या कारणामुळे कुछ कुछ होता है या चित्रपटाचे लिखाण करायला जावेद अख्तर यांनी दिला होता नकार