Join us

'साथ दे तू मला' ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 13:04 IST

आपली स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या एका मुलीची गोष्ट 'साथ दे तू मला' या मालिकेतून पाहायला मिळेल.

स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. अशीच एक हटके गोष्ट लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचे नाव आहे 'साथ दे तू मला'. आपली स्वप्न पूर्ण करु पाहणाऱ्या एका मुलीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल.

ही गोष्ट आहे प्राजक्ताची. फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा असणाऱ्या प्राजक्ताला आपल्या क्षेत्रात खूप नाव कमवायचंय अगदी लग्नानंतरसुद्धा. करिअरसाठी सबकुछ कुर्बान असे मानणाऱ्यातली ती नाही. घर-संसार सांभाळून तिला तिच्या स्वप्नांना गवसणी घालायची आहे. खरतर घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत कुशलरित्या सांभाळणाऱ्या तमाम स्त्रियांचे प्राजक्ता प्रतिनिधित्व करते आणि म्हणूनच 'साथ दे तू मला' या मालिकेची गोष्ट प्रत्येकाला आपलीशी वाटेल. प्राजक्ताला तिची स्वप्न पूर्ण करण्यात कशी आणि कुणाकुणाची साथ मिळणार याची रंगतदार गोष्ट ‘साथ दे तू मला’ मधून उलगडेल.नवोदित अभिनेत्री प्रियांका तेंडुलकर या मालिकेतून पदार्पण करत आहे. तर आशुतोष कुलकर्णी, सविता प्रभुणे, रोहन गुजर, प्रिया मराठे, पियुष रानडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये नेहमीच समाजात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब पाहायला मिळतं. साथ दे तू मला या मालिकेतूनही सगळ्यांच्याच मनातला प्रश्न मांडण्यात येणार आहे. हळूवार नातं उलगडणारी ही खूप सुंदर गोष्ट आहे.’तेव्हा प्राजक्ताच्या स्वप्नांचा हा प्रवास पाहण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका ‘साथ दे तू मला’ लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.     

 

टॅग्स :स्टार प्रवाह