Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारकची टीम झाली सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 17:05 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे नुकतेच 2000 भाग पूर्ण झाले. कोणत्याही विनोदी मालिकेचे इतके भाग होण्याची ही ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे नुकतेच 2000 भाग पूर्ण झाले. कोणत्याही विनोदी मालिकेचे इतके भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तारकच्या टीमने त्यांचे हे यश नुकतेच सेलिब्रेट केले. यावेळी या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. या सेलिब्रेशनच्यावेळी त्यांनी फुगे हवेत सोडले. त्याचसोबत या मालिकेची संपूर्ण टीम सैराट या चित्रपटाच्या झिंगाट या गाण्यावर थिरकली. "आज आम्हाला मिळालेले यश हे केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे. त्यामुळे आम्ही प्रेक्षकांचे आभार मानतो", असे या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी सांगतो.