Join us  

'तारक मेहता..' संपणार? निर्माते असित मोदी म्हणाले, 'दयाबेनला परत आणू शकलो नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 11:53 AM

तारक मेहता मालिका कायमची बंदच होणार का?

गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) सध्या काही ना काही कारणाने अडचणीत सापडली आहे. आधी कलाकार सोडून गेले, काही कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आणि आता दयाबेन परत येणार अशी केवळ अफवा उठवून प्रेक्षकांची थट्टा केली यामुळे मेकर्सला हे सगळं चांगलंच महागात पडलं आहे. अशा परिस्थितीत तारक मेहता मालिका कायमची बंदच होणार का? तर याचं उत्तर निर्माते असित मोदी यांनी नुकतंच दिलं आहे. 

६ वर्षांपूर्वी दयाबेन उर्फ अभिनेत्री दिशा वकानी यांनी मालिका सोडली. यानंतर दयाबेनला परत आणा ही मागणी आजही जोर धरुन आहे. मात्र दिशा वकानीचा सध्यातरी मालिकेत कमबॅक करण्याचा विचार नाही. काही दिवसांपूर्वी दयाबेन मालिकेत परत येणार असा प्रोमो चालवण्यात आला होता. मात्र असं काहीच झालं नसल्याने नेटकऱ्यांनी मालिका बॉयकॉट करा अशी मागणी सुरु केली. मालिका खरंच बंद होणार का यावर निर्माते असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार असित मोदी म्हणाले, 'मी माझ्या दर्शकांचं मनोरंजन करण्यासाठी इथे आलो आहे आणि मी त्यांच्याशी कधीच खोटं बोलणार नाही. काही परिस्थितींमुळे आम्ही दया व्यक्तिरेखेला परत आणू शकत नाहीए. पण याचा अर्थ हा नाही की दयाबेन ही व्यक्तिरेखा शोमध्ये येणारच नाही.'

ते पुढे म्हणाले, 'दिशा वकानी असो किंवा अजून कोणीही ते वेळ आली की समजेलच. प्रेक्षकांना मी वचन देतो की दया नक्कीच परत येईल आणि तारक मेहता कुठेही जाणार नाही. एक कॉमेडी शो सलग १५ वर्ष सुरु ठेवणं हे काही सोपं नाही. ही मालिका एकदम हटके आह. इतक्या वर्षात यात एकही लिप दाखवण्यात आलेला नाही.'

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारटेलिव्हिजनसोशल मीडिया