Join us  

एकीकडे 'तारक मेहता...'चा वाद, अन् बबिताने मानले निर्मात्यांचे आभार; मालिकेला १५ वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 12:38 PM

मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनेत्री मुनमुन दत्त म्हणजेच बबिताने मात्र निर्मांत्यांचं तोंडभरुन कौतुक केलंय.

गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' बाबत अनेक वाद समोर येत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र मालिकेच्या सेटवर पडद्यामागे बऱ्याच वाईट गोष्टी घडत आहेत. मालिकेचे निर्माते असित मोदींवर अनेक कलाकारांनी गंभीर आरोप केलेत. अभिनेत्री जेनिफरने तर त्यांच्या लैंगिक शोषणाचाही आरोप केलाय. दरम्यान हे सर्व वादविवाद कानावर पडत असतानाच मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) म्हणजेच बबिताने मात्र मालिकेचं तोंडभरुन कौतुक केलंय.

काय आहे बबिताची पोस्ट?

'आभार आणि कृतज्ञता हे दोनच भाव आज मला व्यक्त करायचे आहेत. गेल्या १५ वर्षांपासून माझ्या जीवनात जे काही चांगलं घडतंय त्यासाठी मी आभारी आहे. सोबतच सगळे माझ्यावर प्रेम करत आहेत. लोकांनी शो बघितला आणि आम्हाला त्यांच्या जीवनाचा भाग करुन घेतलं. माझ्या सर्व अप्रतिम सहकाऱ्यांचे आभार. कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि मालिकेसंबंधित प्रत्येक व्यक्तीचे आभार. असितजींनी एकामागोमाग एक ध्येय गाठण्यासाठी सतत परिश्रम घेतले. हे यश म्हणजे प्रत्येकाच्याच मेहनतीचा, वेळेचा, पॅशनचा, सहनशीलतेचा, कामासाठी झोकून देण्याचा, निश्चयाचा आणि मालिकेसाठी सर्व काही देण्याचा परिणाम आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला १५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बबिताने सेटवरील सर्व कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत. जेठालाल आणि पोपटलाल सोबत  तिने पहिला फोटो शेअर केला आहे. सर्व कलाकारांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतलेला दिसतोय. सर्वांनी हसतहसत कॅमेऱ्यासमोर पोज देत हा दिवस साजरा केला आहे. एकीकडे मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप होत असतानाच आहेत ते कलाकार मात्र सेटवर एन्जॉय करताना दिसत आहेत.

टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनटिव्ही कलाकार