Join us

तेज सप्रूने या भूमिकेसाठी घेतोय विशेष मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 15:29 IST

आरंभ ही मालिका सध्या तिच्या नुकत्याच भेटीला आलेल्या प्रोमोमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे बाहुबली 2 चे लेखक एस. राजामौली ...

आरंभ ही मालिका सध्या तिच्या नुकत्याच भेटीला आलेल्या प्रोमोमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे बाहुबली 2 चे लेखक एस. राजामौली ही मालिका सादर करत आहेत. या मालिकेतील अग्निमित्र ही भूमिका तेज सप्रूने साकारणार आहे. या भूमिकेसाठी तो विशेष मेहनत घेतो आहे. गेली 40 वर्षे चित्रपटांमध्ये सक्रिय असलेला तेज सप्रने हा अभिनेता मनाने तरुणच आहे. तेज सप्रू आजही रोजचा व्यायाम करणे आणि दोनवेळचे जेवण चुकवीत नाही. आपल्या भूमिकेबदल तेज सांगतो, “मी आज 61 वर्षांचा असून ‘उत्तम खा आणि निरोगी राहा’ या तत्त्वावर माझा विश्वास आहे. मी रोज सकाळी 6.00 वाजता उठतो आणि चालायला जातो. त्यानंतरच मी कोणतेही काम हाती घेतो. मला जेव्हा ही अग्निमित्रची भूमिका देऊ करण्यात आली, तेव्हा त्यांनी मला सांगितले की या मालिकेचे चित्रीकरण टोकाचे वातावरण असलेल्या स्थळांवर केले जाणार असल्यामुळे मी स्वत:ची तब्येत तंदुरुस्त राखावी. आम्ही तब्बल 46 अंश सेंटिग्रेड तापमानातही चित्रण केलं असून उणे पाच अंश तापमानातही केलं आहे. प्रत्येकाने दररोज निदान एक तास तरी चालावं, ही माझी सर्वांना विनंती आहे. ज्याप्रमाणे या चालण्याच्या व्यायामाचा मला इतकी वर्षं उपयोग झाला, तसाच तो इतरांनाही होईल, याबद्दल माझी खात्री आहे,” असे तो सांगतो.या मालिकेच्या सेटला अस्सल सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.या सेटवरच्या सगळ्या सिंहासनांवर मौल्यवान खडे आणि रत्ने बसवण्यात आली आहेत. या मालिकेच्या माध्यमातून तनुजा या छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.