Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं? घरी आली पाहुणे मंडळी, अभिनेत्री म्हणते- "वयात आल्यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 16:47 IST

प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. 

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. तिने साकारलेली येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर इतकी कोरली गेलीय की त्यापुढे छावामधील रश्मिका मंदानादेखील फिकी पडली. प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. 

प्राजक्ताच्या घरी पाहुणे मंडळी आली होती. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. दागिन्यांनी अभिनेत्रीने साजशृंगार केला आहे. तर केसांत गजरा माळल्याने तिचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. प्राजक्ताच्या हातावर मेहेंदीही दिसत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खुर्चीत बसल्याचं दिसत आहे. तर तिने खांद्यावर पदरही घेतला आहे. हार्ट इमोजी तिने कॅप्शनमध्ये दिले आहेत. पाहुणे मंडळी असा ह‌ॅशटॅगही तिने वापरला आहे. 

प्राजक्ताच्या या फोटोंवरुन अभिनेत्रीचं ठरलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटस करत प्राजक्ताचं अभिनंदन केलं आहे. तर प्राजक्ताने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. "इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब कधी लागणार? वयात आल्यावर लग्न कधी करणार? हे प्रश्न ठरलेले असतात", असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

प्राजक्ता गायकवाडचं खरंच लग्न ठरलंय का? याबाबत अभिनेत्रीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण, तिच्या या पोस्टवरुन चाहत्यांनी तिचं लग्न ठरल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडटिव्ही कलाकार