Join us
Daily Top 2Weekly Top 5

Swapnil Joshi : 'अचानक मोठी झाली यार...' स्वप्निल जोशीची लाडक्या लेकीसाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:45 IST

स्वप्निल जोशीनं त्याच्या लेकीसाठी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (swapnil joshi).उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वप्नीलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण करणारा स्वप्नील आज गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बऱ्याचदा तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनयावर प्रेम करणाऱ्या स्वप्नीलचं त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे हे त्यांच्या अनेकवेळा सोशल मीडियावरील पोस्टवरुन दिसते. स्वप्निल जोशीनं त्याच्या लेकीसाठी  सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

स्वप्नीलने त्याच्या लेकीसाठी केलेली एक पोस्ट सध्या विशेष चर्चेत आली. त्याने मायराची एक रिल शेअर केली आहे. यात ती साडी नेसून दिसतेय.  इरकली साडीमध्ये स्वप्नीलची लेक मायरा खूपच क्युट दिसते आहे. हे रील शेअर करताना स्वप्नील जोशीने लिहिलं की, 'मायरा, अचानक मोठी झाली यार...' या पोस्टसोबत त्याने रडणाऱ्या चेहऱ्याचं इमोजीही पोस्ट केलीय. 

स्वप्नीलच्या या पोस्टवर प्रसाद ओक, शिल्पा तुळसकर, मंजिरी ओक, संजय जाधवसह अनेक सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. मुलगी शाळकरी वयात असताना अशी साडी नेसली की बापाच्या काळजाचा ठोका च चुकतो, मुली अचानकच मोठ्या होतात अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान दुनियादारी', 'मितवा' अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. उत्तम अभिनयशैली आणि गुड लुकिंगच्या जोरावर आज तो चॉकलेट बॉय म्हणून ओळखला. जातो. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर स्वप्नीलची पावलं छोट्या पडद्याकडे वळली आहेत. त्यामुळेच सध्या तो तू तेव्हा तशी या मालिकेत झळकत आहे. मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.

टॅग्स :स्वप्निल जोशी