स्वामी ओमचे पुन्हा बेताल वक्तव्य... म्हणे सलमान खानला ‘एड्स’, म्हणूनच देतोय लग्नाला नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 17:59 IST
बिग बॉसच्या सिझन-१०चा सर्वाधिक वादग्रस्त सदस्य असलेले स्वामी ओम यांची घरातून हकालपट्टी केल्यानंतर शोचा होस्ट सलमान खानला बदनाम करण्याचा ...
स्वामी ओमचे पुन्हा बेताल वक्तव्य... म्हणे सलमान खानला ‘एड्स’, म्हणूनच देतोय लग्नाला नकार!
बिग बॉसच्या सिझन-१०चा सर्वाधिक वादग्रस्त सदस्य असलेले स्वामी ओम यांची घरातून हकालपट्टी केल्यानंतर शोचा होस्ट सलमान खानला बदनाम करण्याचा जणू काही त्यांनी विडाच उचलला आहे. सलमानच्या कानखाली मारल्याची बतावणी करणाºया स्वामी ओमने पुन्हा एकदा सलमानच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून आपला तोंडपट्टा सुरू ठेवला आहे. स्वामी ओमच्या म्हणण्यानुसार सलमान खानला ‘एड्स’ असल्यानेच तो लग्नाला नकार देत आहे. स्वामी ओमचा हा आरोप थेट सलमानच्या चरित्रावरच असल्याने यावर सलमान प्रतिक्रिया देणार काय? याची त्याच्या फॅन्सला नक्कीच उत्सुकता असेल. बिग बॉस शोच्या सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या स्वामी ओमला घरातील गलिच्छ आणि अश्लील वर्तणुकीमुळे घराबाहेर काढण्यात आले होते. विशेष म्हणजे घरात बाउन्सरला पाठवून त्यांची हकालपट्टी केली होती. मात्र घराबाहेर पडल्यानंतर स्वामी ओमने आपला तोंडपट्टा असा काही सुरू ठेवला, ज्यामुळे सलमानसह शोचे निर्मातेही हैराण झाले आहेत. सलमान खान याला तर बदनाम करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. कॅमेºयासमोर आले की ते बिग बॉस आणि सलमान खान यांच्यावर आरोपांची बरसात करतात. सलमान खान याच्या कानाखाली मारण्यापासून ते तो ड्रग्ज घेत असल्याचे आरोप स्वामी ओमने केले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावरील गुन्ह्यांमधून तो लाच देऊन सुटला असून, पुन्हा मी त्याचे सर्व गुन्हे बाहेर काढणार असल्याचे बेताल आरोप केले होते. आता त्यांनी पुन्हा एक नवा आरोप केला असून, थेट सलमानच्या चरित्रावरच चिखलफेक केली आहे. स्वामी ओमच्या मते, सलमान खान याने आतापर्यंत लग्न न करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्याला ‘एड्स’ आहे. ही बाब त्याने आतापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली आहे. त्याचबरोबर आपल्या वक्तव्याला आणखी वेगळे वळण लावताना स्वामी ओम म्हणाले की, सलमानची एक पत्नी असून, त्याला मुलगीदेखील आहे. हे दोघेही लंडनमध्ये राहत असून, याची कोणालाच खबरबात नाही. आता स्वामी ओमच्या या बेताल वक्तव्यांमुळे त्यांनी सलमानच्या एड्सबाबत केलेल्या दाव्यात कितपत तथ्यता, हे सांगणे मुश्किल आहे. वास्तविक बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आलेले स्वामी ओम उलटसुलट वक्तव्य करून माध्यमांमध्ये झळकत आहेत. याच स्वामी ओमने शोच्या सुरुवातीला सलमानचे वर्षभरात लग्न लावून देणार असल्याचे म्हटले होते, आता ते पुन्हा उलटसुलट वक्तव्य करीत असल्याने चर्चेत आहे. मात्र या वक्तव्यामुळे एका टीव्ही कार्यक्रमात त्यांना सलमानच्या फॅन्सनी चांगला चोपही दिला होता. परंतु आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवण्यास त्यांना अद्यापही समज आलेली दिसत नाही.२७ जानेवारी सलमान खानच्या विरोधात काढणार रॅलीसलमान खान हा आयएसआय एजंट असल्याने त्याच्या विरोधात येत्या २७ जानेवारी रोजी रॅली काढणार असल्याचे स्वामी ओमने म्हटले आहे. तब्बल एक लाख समर्थकांना घेऊन ते सलमानचा विरोध करणार आहेत. त्याचबरोबर याचवेळी बिग बॉसच्या घराला आग लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता स्वामी ओमच्या या धमक्यांमध्ये कितपत दम आहे, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. मात्र सलमान खानची बदनामी करण्यासाठी ते कुठलीच कसर सोडत नसल्याने सलमान स्वामी ओमला उत्तर देणार की, त्यांना टाळणार हे बघणे मजेशीर ठरेल.