Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमान' मालिकेतील निहारिका पडली या अभिनेत्याच्या प्रेमात ? त्या फोटोनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 12:44 IST

'स्वाभिमान' मालिकेत निहारिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका स्वाभिमानने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. या मालिकेत निहारिकाची भूमिका अभिनेत्री दिशा परदेशी हिने साकारली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. तिने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये असलेल्या अभिनेत्याच्या ती प्रेमात असल्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

स्वाभिमान मालिकेमध्ये सध्या रंजक घटना घडामोडी घडताना दिसतात. या मालिकेत दिशा हिने अतिशय जबरदस्त काम केले आहे. तिच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक देखील होत आहे. स्वाभिमान मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत निहारिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. ती बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता सुमित भुसावळे याला डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. नुकताच सुमित आणि दिशा यांनी २०२२ अर्थात नवीन वर्षाचे स्वागत केले. सुमित आणि दिशा या दोघांनी न्यू इयर पार्टी एकत्र सेलिब्रेट केली.

‘एक असा मित्र जो माझ्या सोबत कायम असतो, असे कॅप्शन दिशाने लिहिले आहे. या पोस्टनंतरच ही चर्चा प्रेक्षकांमध्ये होऊ लागली.  दिशा आणि सुमित एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेला अद्याप त्या दोघांनी दुजोरा दिलेला नाही.