Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पियुष माझ्यासाठी तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस", सुरुची अडारकरची खास पोस्ट, शेअर केला मोदक बनवतानाचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 16:45 IST

अभिनेत्री सुरुची अडारकरचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. सुरुचीने पती आणि अभिनेता पियुष रानडेसह गणेशोत्सव साजरा केला. 

सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. सेलिब्रिटींमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सुरुची अडारकरचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. सुरुचीने पती आणि अभिनेता पियुष रानडेसह गणेशोत्सव साजरा केला. 

सुरुची आणि पियुषने गणेशोत्सवानिमित्त खास मोदक बनवले. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत सुरुची आणि पियुष उकडीचे मोदक बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने पोस्ट लिहिली आहे. 

सुरुची अडारकरची पोस्ट 

गणपती बाप्पा मोरया!! 🙏🏻🌺बाप्पा,तुझ्या येण्याने सुख, समृद्धी, आरोग्य, शांती लाभले आहे.. असच सगळ्यांनी आनंदी आणि समाधानी रहावं हीच तुझ्या चरणी प्रार्थना.तुझा आशीर्वाद असाच असू दे कायम🙏🏻🙏🏻🌺

@piyush_ranade_official तू बाप्पाचा आशीर्वाद आहेस माझ्या आयुष्यात.प्रत्येक वेळी तू बरोबरीने माझ्या सोबत उभा असतोस..सगळी कामं वाटून बरोबरीने करतोस.

सुरुची आणि पियुषने डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. त्याने याआधी शाल्मली तोळे आणि मयुरी वाघ यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. 

टॅग्स :सुरुची आडारकरपियुष रानडेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता