आश्चर्य! म्हणून सोशल मीडियापासून दूरच राहणे पसंत करते नीती टेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 17:37 IST
सध्या आपण काय करतो हे आपल्या कुटुबियांना कमी बाहेरच्या लोकांनाचा जास्त माहिती देतो.रूटीनमधल्या काही गोष्टींचे स्टेटस, लोकेनश व्हिजीट असे ...
आश्चर्य! म्हणून सोशल मीडियापासून दूरच राहणे पसंत करते नीती टेलर
सध्या आपण काय करतो हे आपल्या कुटुबियांना कमी बाहेरच्या लोकांनाचा जास्त माहिती देतो.रूटीनमधल्या काही गोष्टींचे स्टेटस, लोकेनश व्हिजीट असे अनेक गोष्टी आपण अपडेट करतो.कलाकरांनाही सोशल मीडियावर प्रत्येक घडामोडींची माहिती आपल्या चाहत्यांशी शेअर करायला आवडते. कधी कधी तर सेलिब्रेटींचे वादग्रस्त ट्वीट स्टेटट अपडेट पाहु चाहत्यांच्या टीकेचा सामनाही करावा लागतो. मात्र सध्याच्या नेटसॅव्ही दुनियेत एक टीव्ही अभिनेत्रीला जास्त सोशल मीडियावर वेळ घालवणे आवडत नाही. गुलाम मालिकेतील नीती टेलर जास्त नेटसॅव्ही नाहीय. अफवा आणि गॉसिप यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी मी सोशल मीडियापासून दूरच राहते. पण कधी कधी जेव्हा मला ते सहन करणं शक्य होत नाही, तेव्हाच मी प्रतिक्रिया देते. एरवी अशा अफवा आणि वादांना उत्तेजन मिळू नये, म्हणून मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्षच करते.‘कैसी ये यारीयाँ (केवाय2)’ या कार्यक्रमातही नीती टेलर झळकली होती.या मालिकेत ती शिवानी या भूमिकेत झळकत असून ती एक शांत, लाजरी मुलगी असून ती शिक्षणासाठी दिल्लीत येते; परंतु तिथली गर्दी आणि वाहतुकीच गजबजाट पाहून मनातून धास्तावते. ती नेहमीच संशयी स्वभावाची असते. एके दिवशी जेव्हा ती बेरहमपूरमध्ये येते, तेव्हा तिच्या दृष्टीने सारं आभाळच फाटतं.भारताच्या गुन्हेगारीच्या या राजधानीत ती स्वत:ला कशी सावरून धरते अशा आशयाची ही मालिका आहे. मला या भूमिकेसाठी कोणतीही शारीरिक तयारी करावी लागली नाही;परंतु मला मानसिक तयारी बरीच करावी लागली. मी यापूर्वी करीत असलेल्या भूमिका या तरुणांना केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या होत्या, त्या तशा हलक्याफुलक्या होत्या. पण गुलाममधील भूमिकेसाठी मला माझी ही प्रतिमा बदलावी लागली. अर्थात गुलाममधल्या या भूमिकेमुळे इतरांच्या मनात असलेली माझी प्रतिमा बदलून जाणार आहे. कारण शिवानी ही जरी एक साधी मुलगी असली, तरी ती ज्या परिस्थितीत सापडते, त्यामुळे ही भूमिका खूप गंभीर होते.ही भूमिका साकारल्यावर संध्याकाळी मी मनसिकदृष्ट्य़ा पार थकून गेलेली असते. कारण या भूमिकेची मागणी खूपच अधिक आहे.त्यामुळे घरी गेल्यावरही मला या भूमिकेतून पूर्णपणे बाहेर पडणं कठीण जातं. ही मालिका आणि या व्यक्तिरेखेमुळे मला व्यावसायिक लाभ होवो, इतकीच इच्छा असे नीतीने सांगितले.