सुरभी इश्कबाजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 17:10 IST
कबूल है या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या सुरभी ज्योतीच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. ती लवकरच इश्कबाज या मालिकेत ...
सुरभी इश्कबाजमध्ये
कबूल है या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या सुरभी ज्योतीच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. ती लवकरच इश्कबाज या मालिकेत झळकणार आहे. इश्कबाज या मालिकेत तिची भूमिका ही काहीच भागांची असली तरी तिच्या एंट्रीमुळे मालिकेला एक वेगळेच वळण मिळणार आहे. स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या हिंमतीवर उभ्या केलेल्या मुलीची व्यक्तिरेखा ती साकारणार आहे. इश्कबाजमध्ये काम करत असल्याचे सुरभीने स्वतः इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवरून तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.