सोनी वाहनीच्या या निर्णयामुळे या कार्यक्रमात काम करणाऱ्या सुनील पालला चांगलाच धक्का बसला आहे. हा कार्यक्रम बंद झाल्यामुळे त्याला खूप राग देखील आला आहे आणि त्याने त्याचा हा राग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यावर काढला आहे. त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम बंद पडला असे सुनील पालचे म्हणणे आहे. कपिल आणि सुनील दोघांनी एकत्र यावे, हेच या कार्यक्रमासाठी चांगले आहे असे त्या दोघांना सांगूनही त्यांनी ती गोष्ट न केल्यानेच हा कार्यक्रम बंद करण्याची आज वेळ आली असल्याचे सुनील पालचे म्हणणे आहे. त्याने युट्युबला एक व्हिडिओ पोस्ट करून आपले मत मांडले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तो सांगतो, सुनील आणि कपिल हे दोघे कॉमेडीची दोन चाके असल्याने त्यांनी दोघांनी एकत्र यावे. ते दोघे एकत्र आल्यास ते कॉमेडीला खूप पुढे घेऊन जातील असे मी त्यांना अनेकवेळा सांगितले होते. पण त्यांनी दोघांनीही माझे ऐकले नाही. तुम्ही आता खूश आहात का? तुमच्या दोघांच्या मनाला शांती मिळाली का? असे मला त्यांना विचारायचे आहे.
Also Read : तर 'या' व्यक्तिमुळे बंद झाला कपिल शर्माचा शो!