सुनील ग्रोव्हरला झाला डेंग्यू, रूग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 11:47 IST
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेल्या वादामुळे रोज यांच्यावर वेगवेगळ्या बातम्या येत असतात.सध्या कपिल शर्मा आजारी असल्यामुळे 'द ...
सुनील ग्रोव्हरला झाला डेंग्यू, रूग्णालयात केले दाखल
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेल्या वादामुळे रोज यांच्यावर वेगवेगळ्या बातम्या येत असतात.सध्या कपिल शर्मा आजारी असल्यामुळे 'द कपिल शर्मा शो' सोनी चॅनेलकडून काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.तर आता सुनील ग्रोव्हरच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे.सुनील ग्रोव्हरला डेंग्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे.सुनील ग्रोव्हरला गुरूवारी मुंबईतील एशियन हार्ट रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार गेल्या तीन दिवसांपासून सुनील ग्रोव्हर तापाने फणफणला होता.काही केल्या ताप कमी होत नव्हता त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने काही मेडिकल टेस्ट केल्या.त्यात त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे लगेचच त्याला एशियन हार्ट रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले.गेल्या 6 महिन्यापासून कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या झालेल्या वादामुळे दोघांच्या मैत्रीत दुरावा आला आणि त्यामुळे सुनीलने कपिलची साथ सोडत आपल्या कामात बिझी झाला.दोघांचेही मार्ग आज वेगळे असले तरीही आजारपणामुळे कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर छोट्या पडद्यावर सध्या झळकत नाहीत.