Join us

स्टुडंट ऑफ द इयर २ मधील कलाकारांनी रायझिंग स्टार 3 च्या सेटवर अशी केली धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 08:00 IST

रायझिंग स्टार 3 च्या प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांना एक थीम पाहायला मिळते. यंदाच्या भागाची थीम ही समर कॅम्प असून या भागासाठी काही विशेष पाहुणे उपस्थित राहाणार आहेत.

ठळक मुद्देअरुणाचल प्रदेशचा लहान राजकुमार ओपस्युएंगने काही स्टंट करण्यासाठी त्याच्या आवडत्या अभिनेत्याला म्हणजेच टायगर श्रॉफला आव्हान दिले. त्यानंतर संजय सतीशने तेरे नाल हे गाणे एका वेगळ्या अंदाजात गाऊन त्याचे कौशल्य दाखविले आणि त्यावर टायगर श्रॉफने डान्स केला.

कलर्सच्या रायझिंग स्टार या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचा सध्या तिसरा सीझन सुरू असून या सिझनमधील स्पर्धकांचा देखील आवाज खूपच चांगला आहे. दर आठवड्याला हे स्पर्धक आपल्या गाण्यांनी लोकांना मंत्रमुग्ध करत आहेत. या कार्यक्रमात आता चांगलीच रंगत आली असून टॉप 8 मध्ये आपली जागा बनविण्यासाठी स्पर्धक धडपड करत आहेत. या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि नीति मोहन साकारत असून या तिघांकडून स्पर्धकांना खूप चांगले मार्गदर्शन मिळत आहे. 

रायझिंग स्टार 3 च्या प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांना एक थीम पाहायला मिळते. यंदाच्या भागाची थीम ही समर कॅम्प असून या भागासाठी काही विशेष पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट हायस्कूल मधील तीन हुशार मुलांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे ते सध्या जोरदार प्रमोशन करत आहेत. याच प्रमोशनसाठी ते नुकतेच रायझिंग स्टार 3 या कार्यक्रमाच्या मंचावर पोहोचले होते. त्यांनी या कार्यक्रमाच्या टीमसोबत चांगलीच धमाल मस्ती केली. 

अरुणाचल प्रदेशचा लहान राजकुमार ओपस्युएंगने काही स्टंट करण्यासाठी त्याच्या आवडत्या अभिनेत्याला म्हणजेच टायगर श्रॉफला आव्हान दिले. त्यानंतर संजय सतीशने तेरे नाल हे गाणे एका वेगळ्या अंदाजात गाऊन त्याचे कौशल्य दाखविले आणि त्यावर टायगर श्रॉफने डान्स केला. या कार्यक्रमात पूर्वी आलिया भटने उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी तिला क्लासिकल संगीताचे धडे देणाऱ्या अनन्या नंदाने तारा सुतारीयाला सुद्धा क्लासिकल संगीत शिकविले. त्यानंतर टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारीया या तिघांनी ये जवानी या त्यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर ताल धरला.

रायझिंग स्टार 3 या कार्यक्रमाचा हा भाग प्रेक्षकांना या शनिवारी रात्री नऊ वाजता कलर्सवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :कलर्स मराठी