Join us

'सुखाच्या सरींनी' हे मन बावरे मालिकेचे ३०० भाग पूर्ण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 16:59 IST

आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. मालिकेतील सगळ्या कलाकारांनी, मालिकेच्या संपूर्ण यूनिटने हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला... केक कट केला, सेल्फी देखील काढला...

छोट्या पडद्यावरील 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील कथानक सध्या रंचक वळणावर आहे.  ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या लाडक्या बनल्या. त्यातही सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. अनु आणि सिध्दार्थ सोबत ते हसले, रडले त्यांना भरपूर आशिर्वाद दिले. 

रसिक या दोघांचे लग्न कधी होईल याची वाट आतुरतेने बघत होते आणि अखेरीस तो क्षण आला, अनु - सिद्धार्थचा विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. या दोघांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. या सगळ्यामध्ये आता मालिकेने ३०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही. मालिकेतील सगळ्या कलाकारांनी, मालिकेच्या संपूर्ण यूनिटने हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला...  केक कट केला, सेल्फी देखील काढला.

नुकतेच अगदी खराखुरा वाटावा असा लग्न सोहळा मालिकेत रसिकांना पाहायला मिळाला. अनु आणि सिध्दार्थ या दोघांमध्ये चांगल्या केमिस्ट्रीमुळेच रसिकांनाही जोडी रोमँटीक वाटू लागली आणि रसिकांनाही या दोघांचा ऑनस्क्रीन लग्नसोहळा पाहायला मिळावा असे वाटत होते. त्यामुळे अगदी रिअल लग्नाप्रमाणेच हे लग्न पार पडले . लग्नात सगळ्या विधी पार पडल्या. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख... नऊवारी साडी, चंद्रकोर, हिरवा चुडा, मंगळसूत्र या लुकमध्ये अनु खूप सुंदर दिसत होती.

तसेच काही महिन्यापूर्वी मालिकेने १५०  भागांचा पल्ला गाठला होता. त्यावेळीही अशाच प्रकारे कलाकारांनी आपला आनंद साजरा  केला होता. आगामी भागातही मालिकेमध्ये रसिकांना बऱ्याच रंजक वळणं पाहायला मिळणार आहेत.