Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम जयदीपची पत्नी आहे लोकप्रिय हिंदी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:59 PM

फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील गौरीसुद्धा एक अभिनेत्री आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. आता या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकलं आहे. त्यामुळे अधिराज आणि नित्याची प्रेमकहाणी नव्याने अनुभवता येईल. या मालिकेतील जयदीप अर्थात अभिनेता मंदार जाधव सध्या सगळ्यांचाच फेव्हरिट झाला आहे. स्मॉल स्क्रीनवरील त्याच्या भूमिकेचे सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर म्हणजेच त्याची पत्नीदेखील एक अभिनेत्री आहे.

मंदारच्या पत्नीच नाव मितिका शर्मा जाधव असे आहे. ती स्वत: देखील एक अभिनेत्री आहे.. देवो के देव महादेव या हिंदी मालिकेत मितिकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

मंदारने देखील हिंदी मालिकेत काम केले आहे. ही मालिका म्हणजे अलादीन. २०१६ साली मंदार आणि मितिकाने लग्न केले. त्यांना दोन मुले असून त्याचे नाव रिदान आणि रेहान असे आहे.मितीका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोज चांगलेच चर्चेत असतात.मंदार आणि मितीकाच्या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात. मितिका आणि मंदार नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

टॅग्स :टिव्ही कलाकार