Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील जयदीपची खरी बायको आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 07:00 IST

जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधवची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. तिने हिंदी मालिकेत काम केले आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप अर्थात अभिनेता मंदार जाधव सध्या सगळ्यांचाच फेव्हरिट झाला आहे. स्मॉल स्क्रीनवरील त्याच्या भूमिकेचे सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. फार कमी लोकांना माहित असेल की मंदारच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर म्हणजेच त्याची पत्नीदेखील एक अभिनेत्री आहे.

मंदारच्या पत्नीच नाव मितिका शर्मा जाधव असे आहे. ती स्वत: देखील एक अभिनेत्री आहे.. देवो के देव महादेव या हिंदी मालिकेत मितिकाने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

मंदारने देखील हिंदी मालिकेत काम केले आहे. ही मालिका म्हणजे अलादीन. २०१६ साली मंदार आणि मितिकाने लग्न केले. त्यांना दोन मुले असून त्याचे नाव रिदान आणि रेहान असे आहे.

मितीका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोज चांगलेच चर्चेत असतात.

मंदार आणि मितीकाच्या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील दैनंदिन मालिकांचे शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे शूटिंग गोव्यात होणार आहे. तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील इतर काही मालिकांचे शूटिंग गोव्यात, सिल्वासा आणि अहमदाबादला होणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह