Join us
Daily Top 2Weekly Top 5

२४व्या वर्षी 'सुख म्हणजे...' फेम गिरीजा प्रभूने मुंबईत घेतलं नवं घर; नेमप्लेटने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 12:12 IST

गिरीजाने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तिने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील गौरी-जयदीपची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतूनच गौरीची भूमिका साकारून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धीझोतात आणलं. 

गिरीजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. गिरीजाने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. गिरीजाने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे. जानेवारी महिन्यात मुंबईतील या नव्या घरात गिरीजाने पूजा केली होती. आता या नवीन घराचा फोटो तिने शेअर केला आहे. 

गिरीजाने अवघ्या २४व्या वर्षी स्वप्नांची नगरी मुंबईत घर घेतलं आहे. या घरावरच्या सुंदर नेमप्लेटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गिरीजाच्या नावाची खण नेमप्लेट तिने घराच्या दरवाजावर लावली आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी गिरीजाचं अभिनंदन केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी