Join us

​काला टीकासाठी सुक्रिती खंडपाल बनली स्टंटवुमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:47 IST

काला टीका या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात अंधश्रद्धांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. त्यामुळे ही ...

काला टीका या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात अंधश्रद्धांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सुक्रिती खंडपाल नैना ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिची भूमिका आतापर्यंत साकारेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याने हे काम करताना तिला मजा येत आहे. या मालिकेत अभिनय करताना ती एखादे काम करत आहे असे तिला वाटतच नाहीये. त्यामुळे ती या मालिकेच्या सेटवर जाण्यासाठी खूप उत्साहित असते असे ती सांगते. या मालिकेत सुक्रितीला अनेक स्टंटदेखील करायला मिळत आहेत आणि यातील अनेक स्टंट हे तिने बॉडी डबलचा वापर न करता स्वतः केलेले आहेत. या भूमिकेविषयी सुक्रिती सांगते, "नैना ही मी साकारत असलेली भूमिका मला खूप आवडत आहे. नैना ही वाईट परंपरांच्या विरोधात उभी राहाणारी व्यक्ती असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ही भूमिका मला माझ्या इतर भूमिकांपेक्षा खूप आव्हानात्मक वाटते. या मालिकेत मी काही स्टंट करतानादेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेसाठी नुकताच मी एक अंडरवॉटर सीन चित्रीत केला. या दृश्यात एका मुलीला मी बुडताना वाचवते असे दाखवण्यात आले होते. खरे सांगू तर मला माझ्या खऱ्या आय़ुष्यात पोहता येत नाही. पण तरीही मी हे चित्रीकरण अतिशय चांगल्याप्रकारे केले. या मालिकेचे चित्रीकरण करताना जंगलातून जातना मी पायातदेखील काहीही घालत नाही. त्यामुळे या मालिकेचा अनुभव हा माझ्यासाठी खूपच वेगळा आहे. तसेच या मालिकेतील एका दृश्यात मी एका मुलीला आगीपासून वाचवले होते. हे सगळे अॅक्शन सीन करायला मला खूपच मजा येते."