Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नागिनची तगडी कास्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 17:23 IST

नागिन या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना खूपच आवडला होता. मालिकेला मिळालेल्या या प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या ...

नागिन या मालिकेचा पहिला सिझन प्रेक्षकांना खूपच आवडला होता. मालिकेला मिळालेल्या या प्रतिसादामुळे या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिल्या सिझनमध्ये मॉनी रॉयने प्रमुख भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या सिझनमध्येही मोनी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत करणवीर बोहरा, अदा खान यांसारखे कलाकारही प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहेत. तसेच दिल्लीवाली ठाकूर गर्ल्स या मालिकेतली मोनिका शर्मा या मालिकेत मौनीच्या बहिणीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सिझनमध्येही एक तगडी टीम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.