सृष्टी बनली नवी नागिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 13:39 IST
सध्या छोट्या पडद्यावर नागिनची चलती आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. मॉनी रॉय, अदा खान, सयंतनी घोष, सारा खान, ...
सृष्टी बनली नवी नागिन
सध्या छोट्या पडद्यावर नागिनची चलती आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. मॉनी रॉय, अदा खान, सयंतनी घोष, सारा खान, रक्षदा खान यांसारख्या अभिनेत्रींनी आतापर्यंत छोट्या पडद्यावर नागिनची भूमिका साकारली आहे. या यादीमध्ये आता सृष्टी शर्माच्या नावाची भर पडणार आहे. चिडीया घर या मालिकेत सृष्टी नागिनची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत घोटक, कपी, गोमुख यांच्या हातून एक कारचा अपघात होणार आहे आणि या कारच्या अपघातामध्ये एक नाग मारला जाणार आहे. याच नागाची पत्नी म्हणजेच सृष्टी तिच्या पतीच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी चिडीया घरमध्ये दाखल होणार आहे.