Join us  

महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल ५’ने या कारणामुळे मारला छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 7:15 AM

‘स्पेशल ५’ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच जिगरबाज पोलीसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. 

ठळक मुद्देमहेश यांना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये धडाकेबाज पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यांचा सळसळता उत्साह तरुणाईला नवी ऊर्जा देतो. महेशजींच्या या एनर्जीमागे नेमकं काय रहस्य आहे हेच जाणून घेण्यासाठी ‘स्पेशल ५’ च्या टीमने त्यांच्या घरावर छापा टाकला.

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या मुंबईतील घरावर नुकताच ‘स्पेशल ५’ च्या टीमने छापा मारला. या छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. महेश कोठारे यांना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये धडाकेबाज पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यांचा सळसळता उत्साह तरुणाईला नवी ऊर्जा देतो. महेशजींच्या या एनर्जीमागे नेमकं काय रहस्य आहे हेच जाणून घेण्यासाठी ‘स्पेशल ५’ च्या टीमने त्यांच्या घरावर छापा टाकला.

‘स्पेशल ५’ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच जिगरबाज पोलीसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. 

महेश कोठारेंसोबत रंगलेल्या मनसोक्त गप्पांमधून ‘स्पेशल ५’ च्या टीमला बऱ्याच टीप्स मिळाल्या आणि ही भेट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.

‘स्पेशल ५’ टीमची शौर्यगाथा प्रेक्षकांना १० डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. 

महेश कोठारे यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या करियरला सुरुवात केली. मराठी चित्रपटात त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारण्यासोबतच अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन केले आहे. धुमधडाका, झपाटलेला, खतरनाक असे अनेक हिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. 

आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. त्याने झपाटलेला २, अनवट यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तो एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. त्याचा पाणी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो काम करण्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा करणार आहे. 

टॅग्स :महेश कोठारेआदिनाथ कोठारे