Join us  

कॉमेडी 'दंगल'मध्‍ये सोनू सूद परीक्षकाच्‍या भूमिकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2017 10:20 AM

'कॉमेडी दंगल'ची खासियत म्‍हणजे हसून हसून लोटपोट करणारे विनोद आणि रसिकांचे तुफान मनोरंजन करण्याचा विडा आता बॉलिवूड अभिनेता सोनू ...

'कॉमेडी दंगल'ची खासियत म्‍हणजे हसून हसून लोटपोट करणारे विनोद आणि रसिकांचे तुफान मनोरंजन करण्याचा विडा आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही हाती घेतला आहे. कारण लवकरच दंगल या नवीन कॉमेडी शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहे. सध्या छोट्या पडद्यावर अनेक कॉमेडी शो सुरू आहेत. आता त्याच यादीत हा शोही जोडला जाणार आहे.सोनू सूद या शोमध्ये कॉमेडी करताना दिसणार नाही तर तो परिक्षकाच्या भूमिका पार पाडणार आहे.गेल्या पर्वात शोला  रसिकांचा खूप चांगला प्रथिसाद लाभला होता. टीआरपी रेटींगमध्येही या शोने पहिल्या दहा शोच्या यादीत आपले स्थान निर्माण केले होते. पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशामुळेच आता दुसार सिझन आणण्याचा घाट निर्मात्यांनी घातला आहे. तिच   लोकप्रियता इकनॅश करण्यासाठी  आता 'कॉमेडी दंगल' २ नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला येणार आहे. शोचा भाग असण्‍याबाबत बोलताना सोनू सूद म्‍हणाला, रसिकांना रडवणं खूप  सोपं आहे याउलट खळखळु हसायला भाग पाडणं हे तितकंच कठिण काम आहे. अनेक वर्षांपासून मी कॉमेडीचा आनंद घेत आलेलो आहे कॉमेडीही माझ्या अंगा अंगात भिनेलेली आहे. अनेक सिनेमांत रसिकांना माझा कॉमेडी अंदाज अनुभवला आहे.त्या कामाचा उपयोग आता छोट्या पडद्यावरही होईल असा विश्वास वाटत असून  कॉमेडी दंगलचा मागील सीजन प्रेक्षकांमध्‍ये खूपच हिट ठरला. त्‍यामुळे दुस-या सिझनसाठी  अपेक्षा अधिक वाढल्‍या आहेत.देशात कॉमेडीला अधिकाधिक पसंती मिळत असताना मी माझ्या अनोख्‍या स्‍टाइलसह  प्रेक्षकांच्‍या मनावर छाप पाडू इच्छितो. मी अशा शोमध्‍ये परीक्षकाची भूमिका बजावण्‍यास नेहमीच उत्‍सुक असतो आणि या शोमध्‍येसुद्धा ही भूमिका पार पाडण्‍यास उत्‍सुक आहे. उत्‍तम कॉमेडी व मनोरंजनातून प्रेक्षकांच्‍या अपेक्षा पूर्ण कराव्‍यात, अशी माझी इच्‍छा आहे. आशा करतो की प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मला यश नक्की मिळेल असे सोनू सूदने सांगितले. आता आगामी काळात हा शो इतर कॉमेडी शोला टक्कर देण्यास यशस्वी ठरतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.