Join us  

द कपिल शर्मा शोमध्ये सोनू सूदने सांगितले त्याच्या या प्रेमाविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 8:30 PM

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सिम्बा चित्रपटाची टीम झळकणार आहे. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले आहे. 

ठळक मुद्देद कपिल शर्मा शो मध्ये हजर राहण्यासाठी सोनू सूदने भडक नारंगी रंगाचे बूट निवडले होते. हे बूट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. जेव्हा कपिलने त्याला त्याच्या बुटांबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, त्याला बुटांचे फार वेड आहे.रोहित शेट्टी देखील लगेचच म्हणाला की, सोनू सोबत मैत्री करून माझा खूप फायदा झाला आहे. कारण सोनू त्याच्या जवळच्या लोकांना अनेकवेळा बूट भेटवस्तू म्हणून देतो.

कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच त्याच्या प्रसिद्ध कॉमेडी शोमधून पुनरागमन करणार आहे. कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार असणार तसेच कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सिम्बा चित्रपटाची टीम झळकणार आहे. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले आहे. 

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ तसेच सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान हजेरी लावणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. पण कपिलच्या कार्यक्रमात पहिल्या भागात सिम्बा चित्रपटातील रणवीर सिंग, सारा अली खान, सोनू सूद आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी हजेरी लावणार आहेत. या भागाच्या चित्रीकरणादरम्यान सोनूचे बुटांबद्दल असलेले प्रेम सर्वांनाच समजले.

द कपिल शर्मा शो मध्ये हजर राहण्यासाठी सोनू सूदने भडक नारंगी रंगाचे बूट निवडले होते. हे बूट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. जेव्हा कपिलने त्याला त्याच्या बुटांबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, त्याला बुटांचे फार वेड आहे आणि तो सारखे नवीन नवीन बूट खरेदी करत असतो. सोनूला बूटाविषयी असलेल्या प्रेमाविषयी सिम्बाच्या टीमला देखील चांगलेच माहीत आहे. त्यामुळे याविषयी रोहित शेट्टी देखील लगेचच म्हणाला की, सोनू सोबत मैत्री करून माझा खूप फायदा झाला आहे. कारण सोनू त्याच्या जवळच्या लोकांना अनेकवेळा बूट भेटवस्तू म्हणून देतो. मला खात्री आहे की, हे ऐकल्यानंतर बर्‍याच लोकांना सोनूशी मैत्री करायला आवडेल. अर्थात आम्हालाही ही गोष्ट आवडतेच. कारण फुकटात बूट मिळत असतील तर त्याला नाही कोण म्हणेल!

टॅग्स :सोनू सूदकपिल शर्मा