Join us

सोनालीला मिळाले खास बर्थ डे गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 10:39 IST

कोणी निंदा कोणी वंदा मनोरंजन करणे हाच आमचा धंदा म्हणत छोट्या पडद्यावर कलाकार आपल्या कॉमेडी कल्ला करत रसिकांचे मनोरंजन ...

कोणी निंदा कोणी वंदा मनोरंजन करणे हाच आमचा धंदा म्हणत छोट्या पडद्यावर कलाकार आपल्या कॉमेडी कल्ला करत रसिकांचे मनोरंजन करत आहेत‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ प्रेक्षकांना एका नव्या ढंगात सहा महिन्यांआधी रसिकांच्या भेटीला आले. या कार्यक्रमातील कल्लाकार प्रेक्षकांना त्यांच्या अतरंगी, खुशखुशीत विनोदशैलीने पोट धरून हसवत आहेत. कार्यक्रमातील अनेक बदलांबरोबर यामधील परीक्षक देखील बदलले ज्यांनी काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली. याच कार्यक्रमातील महाराष्ट्राची लाडकी आणि आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहा महिन्यामध्ये या परिवाराचा एक महत्वपूर्ण भाग बनली आहे. याच आपल्या लाडक्या हास्यपरीला म्हणजेच सोनाली कुलकर्णीला ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधील कल्लाकारांनी एक छानसं सरप्राईझ दिल,ज्यामुळे सोनालीला खूपच आनंद झाला. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’मंचावर सोनालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.सेटवर तिच्यासाठी केक मागविण्यात आला होता, स्टेज फुग्यांनी सजवला होता. याविषयी सोनाली सांगते, ‘माझ्यासाठी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचा भाग होणं खूप आनंदाची गोष्ट असते, जसा प्रत्येकासाठी रविवार असतो तसंच काहीस माझ्यासाठी इथे या मंचावर येण असत. मला खूप मोठ सरप्राईज होत हे कि, माझा वाढदिवस इतक्या सुंदर प्रकारे माझ्या या सगळ्या मंडळीनी साजरा केला. हे माझ्यासाठी खूप सुंदर सरप्राईज होतं. या मंचावर येऊन मला सकारात्मक दृष्टीकोन मिळाला म्हणजेच छोट्या - छोट्या अडचणीमधून देखील आनंद कसा शोधावा हे कळालं.माझ्या वाढदिवसानिमित्त मला तर सरप्राईझ मिळालेच पण आता प्रेक्षकांदेखील लवकरच एक सरप्राईझ मिळणार असल्याचे सोनालीने सांगितले आहे.