Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 14: या कारणामुळे बिग बॉसच्या घरातून सोनाली फोगट झाल्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 15:37 IST

सोनाली फोगट या भाजपाच्या नेत्या आणि प्रसिद्ध टिकीटॉक स्टार आहेत.

या रविवारी बिग बॉस वीकेंडमध्ये प्रेक्षकांना बर्‍याच गोष्टी पाहायला मिळाल्या. सर्व सदस्यांनाही जनतेच्या उलट-सुलट प्रश्नांचा सामना करावा लागला. सलमान खानच्या अनुपस्थितीत शोचे माजी प्रतिस्पर्धी असलेले सिद्धार्थ शुक्लाने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं होते. पण सगळ्यांनासाठी हैराण करणारे होते ते सोनाली फोगट यांचं इविक्शन. सलमान खान नसतानाही सोनाली यांना घरातून बेघर केले जाईल असे कोणालाही वाटले नव्हते.

बेघर झाल्या सोनाली फोगट  सोनाली फोगट या भाजपाच्या नेत्या आणि प्रसिद्ध टिकीटॉक स्टार आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनाली यांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती. जवळपास एक महिना त्या बिग बॉसच्या घरात होत्या. घरात त्याची कामगिरी काही खास नव्हती. त्या शोमध्ये अनेक मुद्द्यांवर बोलताना दिसल्या होत्या, पण प्रेक्षकांवर आपली छाप सोडण्यास त्या कमी पडल्या.  शोमध्ये त्यांनी अली गोनीवर क्रश असल्याचा दावाही केला होता. सोनाली यांनी अनेकदा अलीसमोर आपले प्रेम व्यक्तदेखील केले. शोमध्ये दिसण्याचा तिचा पुरेपूर प्रयत्न केला.पण त्यांचा हा फॉर्म्युला प्रेक्षकांना फारसा आवडला नाही आणि त्या आऊट झाल्या. 

सोनाली फोगट यांनी अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली होती.  ‘अम्मा’ या मालिकेत तिने अभिनेता नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

टॅग्स :बिग बॉस १४