Join us

कुणी तरी येणार येणार गं...! 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळे जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 21:00 IST

अभिनेत्रीच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)ने अल्पावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व कलाकार घराघरात पोहचले आहेत. या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान आता या मालिकेतील अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) हिने चाहत्यांना काही दिवसांपूर्वी खुशखबर दिली होती. ती लवकरच आई होणार आहे. नुकतेच तिचे डोहाळे जेवण पार पडले आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री राधा सागर हिने इंस्टाग्रामवर डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. यात फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ग कुणीतरी येणार येणार ग ग कुणीतरी येणार येणार ग... राधाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो पाहायला मिळत आहे. 

काही महिन्यांपूर्वी राधा सागरने आपण मालिकांमधून ब्रेक घेत असल्याचे सांगत चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिने तिच्या मॅटर्निटी शूटचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता.

वर्कफ्रंटबद्दल...राधा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. राधा फिटनेसला प्रचंड महत्व देते. राधाला अभिनय आणि नृत्याशिवाय स्वयंपाकाचीदेखील खूप आवड आहे. राधा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.तसेच तिने चित्रपटातही काम केले आहे. ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या मलाल चित्रपटात झळकली आहे. राधाला सॅन जोस येथे गोल्डन गेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'नाती खेळ' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राधाला मिळाला आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका