Join us

म्हणून करन पटेलला झाला राग अनावर,कारण ऐकून तुम्ही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 13:02 IST

'ये है मोहब्बतें’ मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता करन पटेल जसा ऑनस्क्रीन रागीट स्वभावाचा दिसतो तसाच तो त्याच्या ख-या आयुष्यातही ...

'ये है मोहब्बतें’ मालिकेतून घराघरांत पोहचलेला अभिनेता करन पटेल जसा ऑनस्क्रीन रागीट स्वभावाचा दिसतो तसाच तो त्याच्या ख-या आयुष्यातही रागीट स्वभावाचाच आहे. करन ‘ये है मोहब्बतें’च्या सेटवरही कोणत्याही कारणांनरून भांडत असल्याचेही बोलले जाते.त्याच्या अशा वागण्यामुळेच सेटवर कोणीही त्याच्याशी जास्त बोलत नसल्याचीही माहिती मिळतेय. मात्र आता तर करनने कहरच केला या अवॉर्ड शोची जबाबदारी अर्जुन बिजलानी आणि करन दोघांवर होती.ज्याप्रमाणे या शोची आखणी करण्यात आली होती त्यानुसार हा शो झाला नाही. त्यामुळे  या दोघांना पुन्हा त्यांच्या एंकरलिक  रिशूट कराव्या लागल्या. दरम्यान करन खूपच नाराज झाला कारण, त्याला या शोनंतर एका पार्टीत जायचे होते तिथे जाण्यासाठी त्याला उशिर होत होता.टेलीप्रॉम्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे करनला एंकरलिंक करण्यास जास्त वेळ द्यावा लागत होता.त्यामुळे करनच्या रागाचा संपूर्ण टीमला सामना करावा लागला. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठीसह करनचे खडके उडत असल्याचे चर्चा असते.यापूर्वीही मालिकेच्या सेटवर ग्लिसरीनचा वापर केल्यामुळे त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहात होते. त्यांवरही तो नाराज होत ग्लिसरीन हे चांगल्या दर्जाचे नसल्याचे आरोप करत त्याने त्याच्या संपूर्ण टीमला खडेबोल सुनावले होते. त्यामुळे सध्या बाहेरच नाहीतर त्याच्या अशा वागण्यामुळे त्याची टीमही चांगलीच तापली आहे. कारण शूटिंग दरम्यान अशा गोष्टी होत असतात त्यात कलाकारांनीच सगळ्या गोष्टी समजूत घेणे गरजेचे असते. दरवेळी छोट्या छोट्या गोष्टीला घेवून राग व्यक्त करणे बरे नव्हे करन असाच सल्ला त्याला त्याचे चाहते सोशल मीडियावर देताना दिसतायेत.