Join us
Daily Top 2Weekly Top 5

आगामी मालिकेत स्नेहा वाघ पुन्हा एकदा चंद्रशेखर यांच्या आईच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 15:34 IST

आपल्यातील अभिनेत्रीच्या अभिनयाचा कस लागेल, अशाच भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री स्नेहा वाघने आतापर्यंत साकारल्या आहेत.तसंच महिलाशक्तीचा आविष्कार दिसून येईल, अशा ...

आपल्यातील अभिनेत्रीच्या अभिनयाचा कस लागेल, अशाच भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री स्नेहा वाघने आतापर्यंत साकारल्या आहेत.तसंच महिलाशक्तीचा आविष्कार दिसून येईल, अशा भूमिकांना स्नेहाने प्राधान्य दिलं आहे.ज्योती, एक वीर की अरदस- वीरा आणि शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग या मालिकांमध्ये नायकांच्या मातेची भूमिका साकारल्यावर स्नेहा वाघ आता पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.‘स्टार भारत’वरील ‘चंद्रशेखर’या आगामी भव्य आणि महत्त्वपूर्ण मालिकेत ती 'चंद्रशेखर' यांची माता जगरानी तिवारी यांची भूमिका उभी साकारणार आहे. चंद्रशेखर नावाच्या केवळ आठ वर्षांच्या एक अतिशय शूर आणि निर्भय मुलाची कथा या मालिकेत सांगण्यात आली आहे.चंद्रशेखरमध्ये ही निर्भयतेची आणि शौर्याची भावना निर्माण करणार्‍या आईच्या भूमिकेत स्नेहा वाघ दिसेल.स्नेहा वाघ म्हणाली, “चंद्रशेखरचं जीवनात एकाच व्यक्तीवर प्रेम असतं- ते म्हणजे त्याची आई. मी जगरानी तिवारी या त्याच्या आईच्या भूमिकेत असेन. या मालिकेचा आतापर्यंतचा अनुभव हा फारच अदभुत आहे.तो काळ वीज नव्हती तेव्हाचा आहे.तेव्हा समाजावर अंधश्रध्देचा पूर्ण पगडा होता आणि समाजात महिलांना काही किंमत नव्हती.त्या पुरुषांच्या दासी होत्या. त्याची पटकथा ही एकदमच वास्तव आहे.मालिकेची भाषा, संवाद, पटकथा हे सारं इतकं वास्तव आणि सच्चं आहे की आपण मुद्दाम काही संवाद बोलत आहोत, असं वाटतच नाही.ती दैनंदिन जीवनातील बातचीतच वाटते.”Also Read:८ महिनेही टिकलं नाही दुसरं लग्न,घरगुती हिंसाचारामुळे या अभिनेत्रीचा दोनदा मोडला संसाररेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं.लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात.मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात.अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत.काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत.अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे.वीरा फेम अभिनेत्री स्नेहा वाघ हिनं एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत. खुद्द स्नेहानं समोर येत याबाबत खुलासा केला आहे. अनुराग सोलंकी या इंटिरिअर डिझायनरसह स्नेहा दुस-यांदा रेशीमगाठीत अडकली होती. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या ८ महिन्यांतच दोघांत बेबनाव झाला आणि ते वेगळे राहू लागले. गेल्या वर्षभरापासून हे दोघे वेगळे राहत आहेत.लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.स्नेहाने घरगुती हिंसाचारामुळे हा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. स्वतः स्नेहानं याचा खुलासा केला आहे. स्नेहाच्या पहिल्या लग्नाबाबतही असंच काहीसं घडलं होतं.