Join us  

भाखरवडी या मालिकेतील स्मिता सरवदेने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 8:30 PM

स्मिताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. आता ती हिंदी मालिकेत झळकत आहे.

ठळक मुद्देही मालिका स्वीकारण्याविषयी स्मिता सांगते, भूमिका अत्‍यंत सुंदर असण्‍यासोबतच सुरेखरित्‍या लिहिण्यात देखील आली आहे. म्‍हणून मी या मालिकेला आणि या भूमिकेला नकार देण्‍याची कोणतीच शक्‍यता नव्‍हती.

भाखरवडी ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत देवेन भोजानी, परेश गणंत्रा मुख्य भूमिकेत असून प्रेक्षकांना त्यांचे काम चांगलेच आवडत आहे. या मालिकेत ज्‍योत्‍स्‍ना गोखलेची भूमिका स्मिता सरवदे साकारत आहे. 

स्मिताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. आता ती हिंदी मालिकेत झळकत आहे. तिच्या या भूमिकेविषयी ती सांगते, मी या मालिकेत ज्‍योत्‍स्‍नाची भूमिका साकारत आहे. ज्योत्सना ही अण्‍णाची पत्‍नी आहे. अण्‍णा विचित्र असताना देखील ती त्‍यांचा खूप आदर करते. माझी भूमिका समतोल आहे आणि आजच्‍या पिढीतील मुले आणि घरातील इतर सदस्‍यांमध्‍ये चांगले नाते ठेवण्‍याचा ती प्रयत्‍न करते. एकदा का एखाद्यासोबत संबंध तुटले तर त्‍याच्‍यासोबत पुन्‍हा हातमिळवणी करायची नाही अशा स्‍वभावाचे अण्‍णा आहेत. पण मी आणि अभिषेक प्रत्‍येक नात्‍याला जपतो. ज्‍योत्‍स्‍ना ही अत्‍यंत सकारात्‍मक आणि साधीभोळी भूमिका असली तरी ती अण्‍णाने चूक केल्‍यानंतर शांत राहत नाही. ती चुकांची जाणीव करून देते. म्‍हणूनच ही अत्‍यंत प्रबळ भूमिका देखील आहे. 

ही मालिका स्वीकारण्याविषयी स्मिता सांगते, भूमिका अत्‍यंत सुंदर असण्‍यासोबतच सुरेखरित्‍या लिहिण्यात देखील आली आहे. म्‍हणून मी या मालिकेला आणि या भूमिकेला नकार देण्‍याची कोणतीच शक्‍यता नव्‍हती. आतापर्यंतचा प्रवास खूपच छान राहिला आहे. या मालिकेतील भूमिका अनोखी असण्‍यासोबत या मालिकेत काम करणारे लोक देखील खूप चांगले आहेत. मी सोनी सबवर देवेन भोजानीसोबत यापूर्वी देखील एका मालिकेमध्‍ये काम केले आहे. म्‍हणून माझे त्‍याच्‍यासोबत चांगले जमते. पण इतर कलाकारांसोबत काम करण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. आमच्‍या सगळ्यांमध्‍ये पहिल्‍या दिवसापासूनच चांगली केमिस्ट्री जमून आली आहे. मला खात्री आहे की, याचा पडद्यावर उत्‍तम अभिनय सादर करण्‍यामध्‍ये फायदा होईल. सेटवर एकत्र काम करताना खूप छान वाटते. प्रत्‍येकजण एकमेकांच्‍या कामाचा आदर करतो आणि एकमेकांना मदत देखील करतो. 

टॅग्स :भाकरवडी मालिका