Join us

स्मिता बंसलवर प्रताडणेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:58 IST

बालिका वधू या मालिकेतील आनंदीच्या सासूची भूमिका करणारी अभिनेत्री स्मिता बंसल हिच्या एनआरआय वहिणीने चोरी व प्रताडणेचा आरोप लावला ...

बालिका वधू या मालिकेतील आनंदीच्या सासूची भूमिका करणारी अभिनेत्री स्मिता बंसल हिच्या एनआरआय वहिणीने चोरी व प्रताडणेचा आरोप लावला आहे. स्मीताची वहिणी मेघा गुप्ता हिने नवरा सौरव, सासू-सासरे व सासरच्या मंडळीच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी, मारहाण, हुंड्यासाठी छळ करण्याचा आरोप करीत एफआरआय दाखल केला आहे. यात स्मिताचे नाव देखील आहे. 2009 साली मेघाचा विवाह सौरव सोबत झाला होता. दोघेही लंडनमध्ये राहत असून तेथे मेघा शिक्षक आहे. आपला पगार ती सौरवला देते व त्यातून घेतलेले दागिने सासूने घातले आहेत. हा माझा छळ असून मला न विचारता पती सौरवने घटस्फोट दिला असल्याचे मेघाने सांगितले.