Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोठ फेम सुप्रिया विनोद यांनी काढले हेअर ड्रेसर आणि रूपल नंदचे स्केच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 14:15 IST

स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेतील कांचनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया विनोद या त्यांच्या खऱ्या आयुष्यात एक उत्तम चित्रकारही आहेत, ...

स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेतील कांचनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया विनोद या त्यांच्या खऱ्या आयुष्यात एक उत्तम चित्रकारही आहेत, हे खूपच कमी जणांना माहीत आहे. अभिनयाबरोबरच त्या आपली चित्रकलेची आवडही आवर्जून जपतात. चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणाऱ्या वेळेत त्या अनेकवेळा चित्र काढताना दिसतात. त्यांच्या अप्रतिम चित्रकलेचा नमुना नुकताच 'गोठ' या मालिकेच्या सेटवर सगळ्यांना पाहायला मिळाला.सुप्रिया विनोदचा जास्तीत जास्त वेळ हा सध्या गोठ या मालिकेच्या सेटवर जातो. त्यामुळे या मालिकेच्या कलाकारांसोबत त्यांचे खूपच चांगले नाते जमले आहे. त्यांची हेअर ड्रेसर सोनू आणि त्यांचे ट्युनिंग तर खूपच छान आहे. आजवर चाहत्यांनी कलाकारांचे स्केच काढल्याचे आपल्याला अनेकदा दिसून आले आहे. मात्र, सुप्रिया विनोद यांच्यासारख्या सीनियर कलाकाराने गोठ या मालिकेच्या हेअर ड्रेसरचे स्केच करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. सुप्रिया विनोद अभिनेत्री म्हणून सुपरिचित आहेतच. मात्र त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षणही घेतले आहे. गोठ या मालिकेच्या चित्रीकरणावेळी थोडा निवांत वेळ मिळाल्यावर आपली चित्रकला जोपासत तो वेळ सत्कारणी त्या लावत असतात. सेटवरच स्केच करण्यासाठी हेअर ड्रेसर सोनू आणि राधाची भूमिका साकारणारी रुपल नंद या त्यांच्यासाठी मॉडेल ठरल्या आहेत. त्यांच्या न कळत सुप्रिया यांनी त्यांचे स्केच कागदावर काढले. आपली छबी चित्ररूपात पाहून सोनू आणि रुपल दोघीही एकदम खूश झाल्या होत्या.आता भविष्यात सुप्रिया विनोद कोणकोणत्या कलाकारांचे स्केच काढतात हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. Also Read : गोठ या मालिकेतील बयोआजीचा तीन वर्षांचा फॅन...